शेतकऱ्यांना पिक विम्याचे मिळणार ₹१६८.३६ कोटी आ .प्रा.राम शिंदे

संघर्षनामा न्यूज l कर्जत 

दि.१८ जुलै २०२४

प्रतिनिधि, उज्वला उल्हारे 

कर्जतसाठी ₹९३.८५ कोटी रुपये तर जामखेड साठी ₹७४.५१ कोटी रुपये . . . . .

शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे कर्जत व जामखेड जि अहमदनगर या दोन्ही तालुक्यांसाठी पिक कापणी प्रयोगानंतर नुकसान भरपाई म्हणून ₹१६८.३६ कोटी इतकी रक्कम मंजूर झालेली आहे . . .

               महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्या नंतर  राज्य सरकारने केंद्र सरकार च्या पंतप्रधान पिक विमा या योजनेच्या धर्तीवर एक रुपया मध्ये पिकविमा हि योजना २०२३ मध्ये सुरु केली आहे . . .

               कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये खरीप २०२३ हंगामा मध्ये झालेल्या पिक विमा नुकसान भरपाई पोटी दोन्ही तालुक्यासाठी ₹१६८.४४कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर झाली आहे . हि रक्कम पिक कापणी प्रयोगा नंतरची आहे . कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्या मध्ये या योजने अंतर्गत पिक नुकसान भरपाई अग्रीम रक्कम म्हणून ₹ १०.४२कोटी रुपये व शेतकर्यांनी नुकसानीचे दावे केल्यानंतर ₹२.६६कोटी रुपये एवढी रक्कम यापूर्वीच संबंधित शेतकर्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे . पिक कापणी प्रयोगानंतरची मंजूर झालेली पिक विमा नुकसान भरपाई रककम राज्य सरकार आणि विमा कंपनी शेतकर्यांच्या खात्यावर टप्या टप्याने वितरीत करणार आहे . . .

                    एक रुपया मध्ये पिकविमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच आणि एकमेव राज्य आहे . कोणत्याही संकटाचा शेतकऱ्यांना सामना करता यावा म्हणून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे प्रतिपादन आमदार प्रा राम शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे . . . . . . .

प्रतिक्रिया : श्री राम शिंदे- 

एक रुपया मध्ये पिक विमा योजना आणून कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीर पणे उभे आहे असे शेतकऱ्यांना अश्वासित केले आहे . . याअगोदर ही कर्जत तालुक्या मध्ये शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी पिकविमा नुकसान भरपाई २५% अग्रीम रक्कम देण्यात आलेली होती तसेच शेतकऱ्यांनी पिक नुकसान झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यामध्ये ही त्या संबंधित शेतकर्यांना पिकविमा नुकसान भरपाई जमा झालेली आहे . महायुती सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे शेतकऱ्याना खूप मोठा दिलासा मिळाला आहे . पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर जमा होण्याची प्रकिया प्रगती पथावर आहे . महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे पिक विमा नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे हे सर्वसामान्य शेतकर्‍यांना माहीत आहे त्यामुळे विरोधकांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये . असा घणाघाती टोलाही आ प्रा .श्री राम शिंदे यांनी कर्जत जामखेडच्या लोक प्रतिनिधीचे नाव न घेता लगावला ..

Related Post