प्रा.अविनाश काळदाते यांना पुणे विद्यापीठाकडून PhD प्रदान.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.९जून २०२४

प्रतिनीधी,

काष्टी येथील प्रा. अविनाश पोपटराव काळदाते यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इंटिग्रेटेड रिन्यूएबल एनर्जी सिस्टीम फॉर स्मार्ट सिटीज् या विषया मध्ये संशोधन केले. यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून यांत्रिक अभियांत्रिकी मधील नवीनतम विषयामध्ये नुकतीच PhD प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ५ जर्नल पेपर्स, २ कॉन्फरन्स पेपर्स आणि २ बुक चॅप्टर अशी प्रकाशने नामांकित जर्नल मध्ये प्रकाशित केली आहेत. यासाठी त्यांना सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे येथील मार्गदर्शक डॉ. अमरसिंह कणसे- पाटील आणि डॉ शशिकांत लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Post