ज्ञानदीप शिक्षण संस्थांतील आठ कर्मचारी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.३१मे २०२४

लिंपणगाव(प्रतिनिधी )-श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था या संस्थांतील आठ कर्मचारी 31 मे२०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थांतील श्री व्यंकनाथ विद्यालयात प्राचार्य  म्हणून श्री दत्तात्रय सस्ते हे कार्यरत होते; तर पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर ह्या कार्यरत होत्या. मुख्याध्यापिका श्रीमती दरेकर यांनी विद्यालयाचे शालेय शिस्तीबरोबरच उत्तम असे प्रशासन सांभाळले. तर याच शिक्षण संस्थेतील व्यंकनाथ विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक पोपटराव राऊत आणि पद्मभूषण वसंत दादा पाटील विद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर रामभाऊ नाईक हे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. या चारही संस्थांच्या शिलेदारांचा विद्यालयांमध्ये सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी श्री व्यंकनाथ विद्यालयात नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे; व माजी संचालक विलासराव काकडे; माजी प्राचार्य बाळासाहेब शेंडे यांच्यासह विद्यालयाच्या सेवक वृंदांनी सेवानिवृत्त प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांना निरोप देण्यात.


         तर ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थांतील अजनज वळणेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेवराव काळे; शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कैलासराव खोमणे; चिंभळे माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक बिभिषन खामकर तर पिंपळसूटी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील कनिष्ठ लिपिक पोपटराव खामकर आदी चार सेवक नियत वयोमानानुसार  31 मे २०२४ अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान या शिक्षण संस्थेतील सेवेत कार्यरत असताना सेवानिवृत्त सेवकांनी अत्यंत प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र असे कार्य पार पाडले. ज्ञानदानाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी सुसंस्कृत घडवून उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन करण्याचे काम या सेवानिवृत्त बांधवांनी पार पाडले. संस्था व विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये या सेवानिवृत्तांनी भरीव असे योगदान दिले. वेळोवेळी शाळा अंतर्गत विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून देश व राज्य पातळीवर या विद्यार्थ्यांना प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी करून उत्तम प्रकारचे यश या सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रेरणेतून मिळाले. त्यातून निश्चितच श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेची मान उंचावली गेली आहे. तशा भावना देखील संस्थाचालक पालकांनी व्यक्त केल्या आहेत. सेवानिवृत्ती बद्दल निवृत्त सेवकांना प्रत्येक विद्यालयांमध्ये पुढील दीर्घायुष्यासाठी उपस्थित स्कूल कमिटीच्या पदाधिकारी व सेवक वृंदांनी सुयश चिंतले.


          या शिक्षण संस्थांतील सेवानिवृत्त सेवकांना निवृत्तीनंतर उत्तम प्रकारचे आरोग्य लाभावे; दीर्घायुष्य  मिळावे; निवृत्ती नंतरही समाजसेवेसह विद्यार्थ्यांना पुन्हा योग्य असे मार्गदर्शन या सेवानिवृत्तांच्या हातून घडावे  यासाठी सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे; उपाध्यक्ष बाबासाहेब भोस; छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड; ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड आदींनी सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Related Post