भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र उकांडे यांची निवड.

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२७मे २०२४

प्रतिनीधी,

भाजपा अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी राजेंद्र उकांडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. मा. मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे ते कट्टर समर्थक आहेत.भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली. 

आ.बबनदादांचा आणि त्यांच्या परिवाराचा सहवास आणि पक्षाने दिलेली जबाबदारी याचा समन्वय साधून भाजपची भूमिका तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी सदैव काम करणार असल्याचं नूतन उपाध्यक्ष राजेंद्र उकांडे यांनी सागितलं.

या निवडीबद्दल डॉ. प्रतिभाताई पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, नगर परिषदेचे गटनेते बापूसाहेब गोरे,अशोक खेंडके, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, संजय खेतमाळीस , संग्राम घोडके, अंबादास औटी आदींनी उकांडे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Post