भिमानदीत सोडलेले पाणी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशाने.!

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे

दि.२४मे २०२४

प्रतिनिधी,

भीमा नदीपात्रामध्ये आलेले पाणी हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार आलेले असल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. असे प्रतिपादन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.

 प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, श्रीगोंदा कर्जत बरोबरच दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अजित दादा पवार यांची समक्ष भेट घेऊन उस व चारा पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने व पुरंदर पाणी उपसा सिंचन योजना काही कारणास्तव बंद असल्यामुळे उपलब्ध पाणी भीमा पात्रात सोडल्यास त्याचा चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल अशी विनंती केल्यानुसार अजित दादा पवार यांनी यामध्ये लक्ष घातले.  अजितदादा पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून कालवा सल्लागार समितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा विचार करता ऊस व चारा पिकांना जीवदान देणे करिता भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले व भीमा नदीला पाणी आले त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे ही आनंदाची व समाधानाची बाब आहे. परंतु सदर पाण्याचे श्रेय श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्ते व नेते हे चुकीच्या पद्धतीने घेत असून आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये असे नागवडे यांनी म्हटले आहे.

Related Post