शासन आपल्या दारी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप

संघर्षनामा न्यूज़। पाथर्डी

दि.10डिसेंबर 2023

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:

तालुक्यातील कोरडगाव येथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखेपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी या योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पाथर्डी- शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग,तहसीलदार श्याम वाडकर, कोरडगावचे सरपंच रविंद्र उर्फ भोरूशेठ म्हस्के, भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, कोरडगाव गणातील बचत गटाच्या अध्यक्षा व महिला सदस्य तसेच विविध गावचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व सदस्य यांच्यासह ग्रामस्थ, महिला, तरुण, पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन उपस्थित होते.

यावेळी कोरडगाव ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच सौ. साखरबाई नामदेव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध मागण्यांचे निवेदन खासदार आणि आमदार यांना देण्यात आले. कोरडगाव मंडळातील गावे दुष्काळातून वगळले, या सर्व गावांचा समावेश दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत करावा, या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी प्राध्यापक हाडोळे, ग्रामपंचायतचे सदस्य अरुण मुखेकर, नागनाथ वाळके, स्वराज बोंद्रे, कानिफ काकडे, अशोक गोरे उपस्थित होते. कोरडगाव ग्रामपंचायतच्या वतीने खासदार आणि आमदार यांचा सत्कार करण्यात आला.

Related Post