गणपति मळ्या मध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण संपन्न..!

श्रीगोंदा​​ | संघर्षनामा न्युज 

  प्रतिनिधी - कोरोना साथ प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम देशभर सुरू झाली असून, या लसीकरणाचा लाभ तालुक्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे.  दिनांक १७ सप्टेंबर रोजी गणपति मळ्यातिल जिल्हा परिषद शाळे मध्ये घेण्यात आलेल्या लसीकरण कॅम्पमध्ये बहुतांश लोकांनी सहभाग घेतला.


मळ्यातिल जनतेच्या आशिर्वादाने आणि नगरसेवक संजय खेतमाळीस,नितीन रोही यांच्या पुढाकाराने तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने आणि सक्रिय कार्यकर्त्यांच्या मदतीने हा कॅम्प यशस्वीरित्या पार पडला. साधारण 257लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
हा कॅम्प तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितिन खामकर,डॉ.संघर्ष राजुळे यांच्या मार्गदर्शना खाली ठेवण्यात आला होता. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. त्रिबंके मॅडम,आरोग्य सेविका जयश्री सानप,नगरसेवक संजय खेतमाळीस,प्रहाचे नितीन रोही,पोपट आळेकर, प्रशांत खेतमाळीस,मारुती खेतमाळीस,विकास खेडकर, संदीप आळेकर,राजू आळेकर,विनोद होले,
यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post