अहमदनगरचे चित्रकार कलाशिक्षक योगेश हराळे यांना आर्ट बिट्स फौंडेशन पुणे यांचे कडून आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर !

श्रीगोंदा ​​​​ | संघर्षनामा न्युज 

लिंपणगाव( प्रतिनिधी ) - अहमदनगरचे चित्रकार कलाशिक्षक योगेश हराळे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा समन्वयक  यांना आर्ट बिट्स फौंडेशन पुणे यांचे कडून आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार बल २०२१ जाहीर झाला आहे.
  अहमदनगर मधील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व संवर्धना साठी  ऐतिहासिक वास्तूंची जलरंगात चित्र रेखाटून प्रदर्शन आयोजन व चित्रांच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तूंचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत व प्रशासना पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या कार्यासाठीया साठी हराळे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

या पूर्वीही  हराळे यांना महाराष्ट्र शासनाचा पर्यटन मित्र  हा पुरस्कार मिळाला आहे.
तसेच दुबई , युरोप, दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनात चित्र प्रदर्शित झाली आहे. 
कॅनडा येथिल गावा  या संस्थेचा अमंग द बेस्ट हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या चित्राला मिळाला आहे. 

अहमदनगर मधील स्नेहालय या सामाजिक संस्थेत चित्रकलेचे विविध उपक्रम राबवत असतात.

न्यु इंग्लिश स्कूल वाकोडी येथे कलाशिक्षक म्हणून काम करत असतांना विद्यार्थ्यांनकडून पर्यावरण पुरक मखर, आकाशकंदील या सारखे उपक्रम चे आयोजन हराळे करतात.

हा पुरस्कार मिळाल्या  बद्दल आमदार कपील पाटील  गुरुवर्य अशोक बेलसरे राज्य अध्यक्ष, आप्पासाहेब जगताप जिल्हा अध्यक्ष,  शिक्षक भारती अहमदनगर  राज्य सचिव सुनील गाडगे ,रुपाली कुरुमकर राज्य अध्यक्ष, रुपाली बोरुडे, जितेंद्र आरु, महेश पाडेकर, अशोक अन्हाड, विजय कराळे,  हनुमंत रायकर, सुदाम दिघे, नवनाथ घोरपडे,  संभाजी पवार ,संजय तमनर, संतोष  मगर,  सोनवणे के डी, सोमनाथ बोंतले, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर,  संजय भुसारी, दत्तात्रय आगवणे, सतीश जामदार,  विलास माने, खोमणे गंगाराम, विलास वाघमोडे, महादेव कोठारे, शंकर भिवसने, राजेंद्र हिरवे, हभप नारायण झेंडे  यांनी  अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Related Post