शेडगाव सोसायटीवर शेंडे ,रसाळ यांचा दणदणीत विजय ..

संघर्षनामा न्यूज़ । श्रीगोंदा

लिंपणगाव (प्रतिनिधी)

श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागलेल्या शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शेंडे ,रसाळ यांच्या पॅनलमधील १३ पैकी ११ जणांना भरघोस मतांनी सभासदांनी निवडून दिले तर दोन जण आगोदरच बिनविरोध निवडून आणत विरोधकांना मात्र चारी मुंड्या चित केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १३ जागेसाठी लागलेल्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते त्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले मतदान झाल्यानंतर मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर सरपंच विजय शेंडे,नागवडे कारखान्याचे संचालक प्रा.रसाळ गटाच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी भरघोस मतांनी निवडून आणत विजयाची माळ घेतली. यामध्ये सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी मध्ये रसाळ लक्ष्मण निवृत्ती २७६, भोपळे अमोल बाळासाहेब २७२, शेंडे राजेंद्र गुंडीबा २६९, भदे हौसराव भानुदास २६८, भुजबळ जगन्नाथ गेणु २६१, धेंडे सिताराम बाबू २५०, बेलेकर किसन कोंडीबा २४५, गोरे सखाराम ज्ञानदेव २४०  महिला प्रतिनिधी मध्ये भदे सिताबाई रोहिदास २८४, रसाळ सुरेखा मारुती २६१ तर इतर मागास वर्ग प्रतिनिधी मध्ये राऊत दत्तात्रय किसन २५२ मतांनी निवडून आले तर अनुसूचित जाती-जमातींमध्ये झेंडे उत्‍तम एकनाथ तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती मध्ये गोळेकर संपत बयाजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती निवडीनंतर सर्व विजयी उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात होते तर विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत होती. माजी सरपंच आणि सरपंच पती विजय शेंडे आणि प्रा.रसाळ हेच विजयाचे खरे दावेदार ठरल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून विजयी उमेदवारांचे तालुक्यातील सर्वच नेत्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अर्जुन वराळे यांनी काम पाहिले.

सोसायटी निवडणुक ही येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीची रंगीत तालीम झाली असून प्रा. रसाळ आणि माजी सरपंच विजय शेंडे यांच्याकडून पुढील रणनीती आखण्यास सुरुवात झाली असून त्याची प्रतिक्रिया सोसायटी निवडणुकीत मिळाली असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू असून  येणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला नेमकी उमेदवार असणार कोण याबाबत सर्वस्तरातून चर्च या निमित्ताने सुरू झाली आहे.

Related Post