श्रीगोंदा | संघर्षनामा न्युज
अनिल तुपे (प्रतिनिधी) - अजनुज येथे अवैध वाळू तस्करी चालु असताना भरधाव ट्रकवर जिल्हा गौण खनिज पथकाने कारवाई केली. पकडलेला ट्रक नदीपात्रात खचल्याने श्रीगोंदे महसूल विभाग व पोलिसांच्या ताब्यात दिला. परंतु वाळूतस्कराने गाडीत बसलेल्या तलाठी व होमगार्डला शिवीगाळी, दमदाटी, धक्काबुक्की, मारहाण करुन पळवून नेला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तलाठ्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती जिल्हा गौण खनिज पथकातील नायब तहसीलदारांना मिळाली. त्यांनी भर दुपारी तालुक्यात अजनुज येथे छापा मारत अवैध वाळूवाहतूक करणारा हायवा क्र. एमएच ४२ एक्यू ८८८३ हा ४ ब्रास वाळूसह ताब्यात घेतला. हायवा कारवाई करिता श्रीगोंदे तहसील कार्यालयात आणताना तो नदी पत्रात खचला. तलाठी सचिन प्रभाकर बळी, , होमगार्ड अक्षय काळे यांच्या ताब्यात दिला. चालक अक्षय सुनील डाळिंबे तसेच हायवा मालक यांनी तलाठी व होमगार्ड यांना शिवीगाळी दमदाटी केली.असे फिर्यादित म्हटले आहे.
धक्काबुक्की मारहाण करून हायवा गाडीमधून खाली उतरण्यास भाग पाडले. व वाळूने भरलेली हायवा ट्रक घेऊन पसार झाले. तलाठी सचिन प्रभाकर बळी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात ड्रायव्हर अक्षय सुनिल डाळिंबे, हायवा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.अवैध वाळू तस्करीला प्रशासनाचेअनेकदा अभय असते .त्यामुळे वाळू तस्करीला आळा घालताना अनेक वेळा जबरी घटना घडल्या आहेत.
यानुसार प्रशासनाने कठोर भूमिका घेतली तर या प्रकाराला पायबंद बसेल परंतु येवढा राजरोस गुन्हा घडुनही अवैध वाळू उपसा जोरात चालू असल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चा चालु आहे.