वंचित बहुजन आघाडीची कर्जत तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी (दादासाहेब जावळे ): दिनांक 24 7 2019 रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही बैठक पार पडली यावेळी माननीय बारसे साहेब यांनी कार्यकर्त्यांना विशेष असे मार्गदर्शन केले तळागाळा पर्यंत जाऊन लोकांची कामे केली पाहिजेत वंचितांना न्याय दिला पाहिजे भटक्या विमुक्त जाती जमाती सर्व समाजाला सर्वसामान्य बहुजन लोकांना न्याय देण्याचं काम तालुक्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे,शासकीय प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, पक्षाच्या गाव तिथे शाखा तालुकाभर  झाल्या पाहिजेत, पक्षाचे काम करत असताना तुम्ही कोणालाही घाबरण्याचे कारण नाही तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत वंचितांना तुम्ही न्याय देण्याचे काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब तुमच्या पाठीशी आहेत असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे साहेब  यांनी यावेळी केले .
या कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते भा को साळवे गुरुजी हे यावेळी अध्यक्ष होते कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा आदेश मानून तळागळातील लोकांना न्याय देण्याचे काम करावे असे यावेळी अध्यक्षीय भाषणात भाको साळवे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. यानंतर कोरणा च्या दुसऱ्या लाटेमध्ये कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक मयत झाले त्या सर्व नातेवाईकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्यांचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात आले,यावेळी जिल्हा महासचिव योगेश भाऊ साठे चंद्रकांत नेटके जिल्हा सचिव तसेच जिल्हा संघटक नंदकुमार गाडे जिल्हा सल्लागार चंद्रकांत डोलारे प्राध्यापक विक्रम कांबळे सर पुणे पिंपरी-चिंचवड चे नेते बाबुराव फुलमाळी तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे अनिल समुद्र गोदड समुद्र भावी वंचित बहुजन महीला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिका पारधे ताई यासह अनेक पदाधिकारी यांची जोरदार भाषणे झाली. यांच्या सह जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कोंडीनकर, बंडा भैलुमे , महादेव भैलुमे,मयूर ओव्हळ,करन ओव्हळ,अजय समुद्र,अवि भैलुमे  पिंटू गोरे,अनिल गोरे,अक्षय भैलुमे बाप्पू भवर,प्रदीप समुद्र,पोपट थोरात,चंद्रकांत नेवसे,भीमराव चव्हाण,रमेश शेलार,संजय शेलार,मुन्ना भाई शेख,चांद भाई मुजावर,नितीन जगधने,कृष्णा झेंडे,कुंदन शेलार,देवा खरात,लखन पारसे,पोपट शेटे,भारत साळवे,शरद शिंदे,करण शिंदे,भाऊ शिंदे, सोनू शिंदे,भगवान गजरमल,कृष्णा शिंदे,विकास शिंदे, बाळासाहेब आल्हाट,कविता अशोक कटारे 
यामध्ये प्रस्ताविक तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी केले तर सुत्रसंचलन तालुका महासचिव प्रा. दादा समुद्र यांनी केले, प्रमुख सल्लागार भीमराव वाघसाहेब यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

Related Post