सगळं काही विसरा पण जन्मदात्या आई वडिलांना विसरु नका - प्रकाश महाराज कुरुमकर

श्रीगोंदा​​ | संघर्षनामा न्युज 

 अजनुज प्रतिनिधी - सगळं काही विसरा पण जन्मदात्या आई वडिलांना मात्र कधीच विसरू नका असे ह.भ.प.प्रकाश महाराज कुरूमकर यांनी केले आहे ते श्रीगोंदा तालुक्यातील गणेशा आनंदवाडी येथे कै. मुक्ताबाई शंकरराव सोनवणे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रवचन सेवेत ते बोलत होते.कुरूमकर महाराज यांनी पुढे सांगितले की स्त्री माहेरून सासरी जाते तेथे एकरुप होते सर्वांना ती सामावून घेते पण तिच पुढे दोन्ही घरांना विसरून आपल्या लेकरा बाळासाठी ती एकरूप झालेली असते.
आई स्वतः पोटाला चिमटा घेऊन दोन खाऊचे घास मुलांसाठी ठेवते त्यांच्यासाठी इतकी काळ्जी घेते लहानाचे मोठे करते पण तिच मुले उतरत्या वयात दोघांची वाटणी करतात.मुलांनी तसे न करता त्यांची उतरत्या वयात सेवा केल्यास मात्र मिळणारा आनंद हा जगा वेगळा असेल.समाजात अशी काही माणसं आहेत की जीवापाड आई वडिलांची सेवा करतात. ज्यांना आई वडील नाहीत त्यांना विचारा आई वडिलांचे महत्व जो पर्यंत घरात आई वडील आहेत तो पर्यंत घराला कुलूप लावण्याची गरज नसते पण ज्यावेळेस आई वडील नाहीत त्यावेळेस तुमच्या घराला कुलूप लागेल ही वस्तुस्थिती आहे.आई वडिलां शिवाय घराला शोभा नाही आई आपल्या मुलांसाठी काय काय करते हे सांगण्यासाठी शब्द सुध्दा कमी पडतील असे ही कुरुमकर महाराज यांनी सांगितले.
यावेळी कोरोना सामाजिक नियमांचे काटेकोर पालन केले आनंदवाडीचे माजी सरपंच पांडुरंग यादव,काष्टी ग्रामपंचायत माजी सदस्य बाळासाहेब पाचपुते,गारचे माजी सरपंच ज्ञानदेव खरात, कुंडलिक महाराज श्रीराम, पत्रकार मंगेश पायगुडे,वैभव वाबळे, जयकुमार शितोळे, लालासाहेब खरात, उत्तम वडवकर, गणेश शिंदे, पोलिस  कॉन्स्टेबल विलास घोरपडे आदि उपस्थित होते उपस्थितांचे आभार काष्टी अर्बन बँकेचे कॅशियर सुनिल खरात यांनी मानले.

Related Post