पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण !

यवतमाळ | संघर्षनामा न्युज 

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले - श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ, येथे आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील,  आ. संजय राठोड  प्रामुख्याने उपस्थित होते.

  सदरील रुग्णवाहिका मैत्रीथाई संस्था, थायलंड यांच्यामार्फत शासकीय रुग्णालयात भेट देण्यात आली. रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सीजन सिलेंडरसह अद्यावत सुविधा आहे. ही रुग्णवाहिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करिता भेट देण्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे, यांचे सहकार्य लाभले. 

कार्यक्रमासाठी अधिष्ठता डॉ. मिलिंद कांबळे, शल्यचिकित्सकशास्त्रचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ.गिरीश जतकर , कान-नाक व घसा शास्त्रचे  प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एस एच गवार्ले, डॉ. ए .के. बत्रा, डॉ. संजय भारती, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. शरद मानकर, डॉ. अरविंद कुडमेथे,सागर पुरी, विकास क्षिरसागर, सुरेंद्र राऊत, अभ्यागत मंडळ व इतर विभागाचे डॉक्टर्स व नर्स उपस्थित होते.

Related Post