बीड । संघर्षनामा न्युज
गोरख मोरे (प्रतिनिधी) - बीड तालुक्यातील मौजे बेलगाव येथील शेतकरी परमेश्वर लक्ष्मण कोळपे यांच्या आत्महत्येनंतर आत्महत्याग्रस्त योजनेतून नरेगा अंतर्गत विहिरीचे बांधकाम होऊन ५ वर्षे होऊन सुद्धा बिल न मिळाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर यांच्या नेतृत्वाखाली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा ईश्वर परमेश्वर कोळपे सह त्यांच्या विहिरीत उतरून ठिय्या आंदोलन केले .
लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे -डॉक्टर ढवळे
आत्महत्याग्रस्त शेतकरी परमेश्वर कोळपे यांच्या पत्नी व धाकटा मुलगा विहिरीवरच कडेला, तर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेश कर यांच्यासह मोठा मुलगा ईश्वर परमेश्वर कोळपे यांनी विहिरीत उतरून या आंदोलनास सुरुवात केली, २ तासा नंतर विस्तार अधिकारी पंचायत समिती बीड, यांनी स्थळ पंचनामा करून नरेगा कक्ष प्रमुख बीड राजेंद्र मोराळे यांच्या स्वाक्षरीसह श्रीमती दैवशाला परमेश्वर कोळपे, यांच्या नावाने कुशल देयक रक्कम, ११९,६३२ /- आज दिनांक १५ जुलै २०२१ रोजी पंचायत समिती कार्यालयातून नरेगा संकेत स्तरावरून कुशल निधी प्राप्त होताच सदर विहीरीचे कुशल देयकसाधा करण्यात येईल अशा लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .
यावेळी लिंबागणेश पोलिस चौकीचे जमादार राऊत, एस, नेकनूर पोलीस ठाण्याचे गुप्तवार्ता विभागाचे प्रशांत शिरसागर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .