यवतमाळ | संघर्षनामा न्युज
जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले
उमरखेड - (दि. 17 सप्टेंबर) आपण सर्वजन देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करीत आहोत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी अमृल्य योगदान दिले असे महात्मा गांधी भारतीय लोकशाहीच्या स्थापनेत अनमोल योगदान दिले असे घटनाकार,
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकसहभागातुन निर्माण झालेल्या भव्यदिव्य पुतळ्याचे व नगरपरिषद उमरखेडच्या वतीने करण्यात आलेल्या सुशोभिकरण व नुतनीकरणाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. १८- सप्टेंबर -२०२१ रोजी सकाळी १०.३० वा. मान्यवरांच्या उपस्थीत संपन्न होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटक मा.ना.श्री . रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक मंत्री, माजी मंत्री तथा आमदार मदनभाऊ येरावार, मा.आ.उत्तमराव इंगळे, प्रमुख उपस्थिती आ.नामदेवराव ससाने, आ.निलय नाईक,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, अरविंदजी भोयर, महेंद्रजी मानकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.हेमंतभाऊ पाटील,डाॅ.आ.
रणजितजीत पाटील,जिल्हा प्रमुख पराग पिंगळे हे उपस्थित राहतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यदिव्य पुतळ्याने औदुंबर नगरीच्या शिरपेचात मानाची भर होणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहावे.