अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा !

श्रीगोंदा ​​​​ | संघर्षनामा न्युज 

 प्रतिनिधी  - देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षात हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती दूर राहिली जे रोजगार होते तेही गेले आणि 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणा-या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित दादा तांबे याच्या नेतृत्वात आज अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने रस्त्यावर उतरत.  पंतप्रधान मोदींच्या  वाढदिवसानिम्मित चहा टपरी सुरु करत चहा वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते राजेंद्र दादा नागवडे, श्रीगोंदा काँग्रेस चे शहराद्यक्ष मनोहर दादा पोटे, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, नगरसेवक सतिष सर मखरे, जिल्हा सरचिटणीस राहुलजी साळवे, युवा नेते नितीन शेलार,ओबीसी नेते कांतीलाल कोकाटे, अहमदनगर दक्षिण सो.मीडिया समन्व्यक भूषण शेळके, विध्यार्थी काँग्रेस शहराद्यक्ष धीरज खेतमाळीस सह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Post