वै.सदाशिव जयंतराव रेडेकर यांनी आदर्श कुंटुंब घडविले - ह.भ.प निळकंठ महाराज तावरे

आष्टी​ | संघर्षनामा न्युज 

अण्णासाहेब साबळे (प्रतिनिधी) - जन्म व मृत्यू ठरल्याठिकाणी ठरल्याप्रमाणेच होत असतो, त्यात कुणालाही बदल करता येत नसतो.लोभ सोडला तर मायानदी तरुन जाता येते.देवाच्या नामाची शक्ती खुप मोठी आहे.हे अनेक संतानी सांगीतले आहे.भक्ती दिसायला सोपी वाटते. साध्य,साधन भक्ती अवघड असते.वै.सदाशिव रेडेकर यांनी आपले आदर्श कुंटुंब घडविले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.निळकंठ महाराज तावरे यांनी केले.आष्टी येथील रेडेकर वस्तीवर विष्णु रेडेकर,बलभीम रेडेकर आणि आप्पासाहेब रेडेकर यांचे वडील वै.सदाशिव रेडेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजीत कीर्तनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी ह.भ.प.रामदास डोरले महाराज,संगीत विशारद बबन बळे,नानासाहेब तवले, रविंद्र तवले,पिराजी तवले,शिवदास केरुळकर,किसन जगताप,सतीषशेठ धस,
प्रा.अर्जुन भोसले बीड,प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ,अशोक हंबर्डे,पत्रकार उत्तम बोडखे,बलभीमबापु खाडे,आजिनाथ खामकर,आर.डी.शिंदे,रविकांत तरटे बापु,ॲड.विजय शेकडे, बन्शीबापु मोरे,पोलीस सोनाजी हंबर्डे,अरुण हंबर्डे, ॲड.बाळासाहेब मोरे,अनिल धनवडे,आजिनाथ धनवडे,आदि सामाजिक,राजकीय क्षेत्रातील उपस्थित होते.विशेष म्हणजे पुण्यतिथीनिमित्त सदाशिव रेडेकर यांचा अर्धाकृती पुतळा वै.सदाशिव रेडेकर यांचे नातु  महेश बन्शीबापु मोरे या शिल्पकाराने केला आहे.

Related Post