आष्टी । संघर्षनामा न्युज
अण्णासाहेब साबळे (प्रतिनिधी) - आष्टी-येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाला सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.१५) पकडले.आष्टीमध्ये ही कारवाई करण्यात आली.
अंबादास फुले असे त्या वरिष्ठ लिपिकाचे नाव असून नळकांडी पुल व खडकीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर या कामाचे बिल काढण्यासाठी अंबादास फुले यांनी तक्रारदाराकडे सहा हजार लाचेची मागणी केली होती.त्यानुसार आष्टीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सापळा रचून लाच घेताना फुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.ही कारवाई पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील,पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी,श्रीराम गिराम,राजेश नेहरकर,भरत गारवे आदींच्या वतीने करण्यात आली.