ज्यांना अमर व्हायचे असेल तर श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचे अनुकरण करावे -ॲड. शंकर महाराज शेवाळे

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . २९ऑक्टोबर २०२६

लिंपणगाव( प्रतिनिधी) आयुष्यामध्ये अमर व्हायचे असेल तर श्री संत ज्ञानेश्वरांचे अनुकरण करावे, असा सल्ला ॲड. शंकर महाराज शेवाळे मंचर यांनी पुण्यस्मरण कार्यक्रमात व्यक्त केला.

 लिंपणगाव येथील आदर्श माता दिवंगत कमलबाई शिवाजीराव चोर यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त ॲड. शंकर महाराज शेवाळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितीतांना सल्ला देत शेवाळे महाराज पुढे म्हणाले की, माणूस पैशाने मोठा होत नसतो तर तो ज्ञानातून व विचारातून मोठा होतो. श्री संत ज्ञानेश्वरांचे विचार थोर होते. शुद्ध विचारातून ते ज्ञानी बनले. त्यासाठी प्रत्येकाचे अंतकरण व कर्म शुद्ध असले पाहिजे. असे सांगून शेवाळे महाराज पुढे म्हणतात की, पापाने पैसा मिळवून बंगला बांधला जातो. तो मात्र व्यर्थ आहे. वाम मार्गाने मिळवलेल्या पैशात सुख मिळणार नाही. तर पाप करत असताना कीर्ती होईल असे वागावे, मरताना भीती वाटते तर प्रत्येकाने नियतीने वागायला हवे. येथे राहायला कोणीच आले नाही. केव्हातरी एक दिवस प्रत्येकाला जावेच लागेल, असे सांगून शेवाळे महाराज पुढे म्हणतात की, संत ज्ञानेश्वरानंतर अनेक जण थोर कीर्तनकार, वारकरी, संगीतकार, वादनकर झाले. परंतु त्यांनाही श्री संत ज्ञानेश्वर माऊली होता आले नाही. त्यामुळे भविष्यात कोणाला संत ज्ञानेश्वर व्हायचे असेल तर सिद्धांत करणारे संत ज्ञानेश्वरांचे अनुकरण करून एकरूप व्हावा लागेल, पुढे बोलताना शेवाळे महाराज आणखी म्हणतात की, नवरात्र उत्सवामध्ये महिलावर्ग जय दुर्गे, जय दुर्गे म्हणतात आणि दहाव्या दिवशी दे मुर्गी अशा पद्धतीने विनाशाकडे जातात. त्यामुळे ज्याला अमर व्हायचे असेल त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांसारखे ज्ञान प्राप्त करून आपले कर्तुत्व सिद्ध करावे.

    पुढे बोलताना शेवाळे महाराज म्हणतात की, जगाच्या नावावर जगावे कसे याविषयी बोलताना ते म्हणाले की, निसर्गाशी प्रत्येकाने जुळवून घ्यावे, ज्यावेळेस निसर्ग कोपेल त्यावेळेस जीवन क्षणभंगुर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी निसर्गावर प्रेम करा, वृक्ष लावा, वृक्ष वाचवा असा सल्ला देखील शेवाळे महाराज यांनी यावेळी बोलताना दिला. कोरोना कालावधीत कै. कमलबाई चोर यांना वाचविण्यासाठी त्यांचे पुत्र दीपक चोरे यांनी 40 लाख रुपये खर्च केले. परंतु त्यांना वाचवण्यात यश आले नाही. कमल नानींनी चाळीस वर्षे पंढरीची वारी केली. मातृप्रेमापोटी दरवर्षी दीपक चोर हे मातोश्रीचे पुण्यस्मरण करतात ही अभिमानास्पद व प्रेरणादायी बाबा असून त्यांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. 

 कार्यक्रमास नागवडे कारखान्याचे संचालक सुभाषराव शिंदे, संचालक विठ्ठलराव जंगले, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण कुरुमकर, संस्थेचे चेअरमन लक्ष्मण भोईटे, सरपंच प्रमोद शिंदे, माजी नगराध्यक्ष नाना कोथिंबिरे, सुनीलराव जंगले, निळकंठ जंगले, प्रदीप कोकाटे, संदीप कोकाटे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर, माजी चेअरमन प्रकाश उंडे, दत्तात्रय खळदकर यांच्यासह चोर परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल राऊत यांनी केले.

Related Post