गुटखा-माव्याच्या अवैध धंदयावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . ४ ऑक्टोबर २०२६

प्रतिनिधी,                                                                                                                                                                                                             

पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार अशोक लिपणे, विजय ठोंबरे, अभिजीत अरकल, प्रताप देवकाते, बिरप्पा करमल, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव व रमीजराजा आत्तार अशांचे दोन पथक तयार करून जिल्हयातील अवैध धंदयाची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.  

 दिनांक 03/10/2026 रोजी पथकाने श्रीगोंदा व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत सुगंधीत तंबाखु, मावा व गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती काढुन 02 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 05 आरोपीविरूध्द 02 गुन्हे दाखल करून एकुण 42,980/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अ.क्र.पोलीस गुरनं व कलमजप्त मुद्देमाल किंमतआरोपीचे नाव

1श्रीगोंदा 903/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5)33,436/-1) अक्षय रविंद्र घोडके, वय 27, रा.सिध्दार्थनगर, श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर

2) रवि बबन दळवी, रा.रोकडोबा चौक, श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा (फरार)

3) यश दळवी पुर्ण नाव माहित नाही, रा.रोकडोबा चौक, श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा (फरार)

2श्रीरामपूर शहर 971/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5)9,544/-1) अरबाज जहिर बेग, वय 25, रा.सुभेदार वस्ती, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर

2) वसीम सत्तार तांबोळी, रा.वॉर्ड नं.2, श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर (फरार)

 वरील कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Post