संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .२ सप्टेंबर २०२६
प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अनेक दिवसांपासून प्रलंबित (Pending Cases) असलेल्या जुन्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून त्यांची लवकरात लवकर कायदेशीर निर्गती (Case Disposal) करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षक सो यांचे आदेशांचे तंतोतंत पालन करत श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
वर्षांनुवर्षे पोस्टे अभिलेखावर प्रलंबित असलेले प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता करणे, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे आणि तांत्रिक पुराव्यांचा योग्य वापर करून तपासावरील प्रकरणे आणि कोर्टात सादर करावयाची दोषारोपपत्रे (Charge-sheets) जलद गतीने पूर्ण करून त्यांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे.
आयोजित केलेल्या मोहीमेमध्ये श्री संजय ठेंगे पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांनी कुशल नेतृत्वाखाली व नियोजनामुळे उपविभागातील (Karjat Sub-Division) सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे निर्गती करण्याचा विक्रम नोंदवला आहे.
मोठ्या प्रमाणात गुन्हे निर्गती झाल्यामुळे पोलीस ठाण्याचा प्रशासकीय आणि कागदपत्रांचा भार कमी झाला आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळाल्याने स्थानिक नागरिक, तक्रारदार आणि नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
मा. पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. ठेंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली असून, या यशस्वी उपक्रमाबद्दल श्रीगोंदा पोलिसांचे समाज घटकातून कौतुक आणि अभिनंदन होत असून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुजित कुमार क्षीरसागर यांचे हस्ते पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे आहे.
मा.पोलीस अधिक्षक यांनी राबवलेल्या जुन्या गुन्हयाचे निर्गती मोहीमेत निर्गती बाबतचा तक्ता सोबत जोडला आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन ने जुने गुन्हे निर्गती बरोबरच चालू वर्षातील गुन्हे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात निर्गती करत पोलीस स्टेशनचे भाग ५ चे २५८ गुन्हे, भाग ६ चे ७६ गुन्हे, दारूबंदीचे १२७ गुन्हे व अकस्मात मृत्यू प्रकरणे असे एकूण ६२० प्रकरणे निर्गती करुन जिल्ह्यात सर्वात जास्त निर्गती करणारे पोलिस स्टेशन असा नावलौकिक मिळवता आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन , अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, उप विभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर , कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सपोनी कौशलरामनिरंजन वाघ, पो.उप.निरी. सचिन लिमकर, संजय वाघमारे, रसूल शेख, पुष्कर कडू, भगवान गांगर्डे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार अशांनी केली आहे.
*सुजितकुमार क्षीरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग कर्जत*