संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१३ सप्टेंबर २०२५
लिंपणगाव ( प्रतिनिधी) आजी-माजी सैनिक संघटना श्रीगोंदा तालुका व शहीद स्मारक समिती श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने रत्न कमल मंगल कार्यालय येथे सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत डॉ. देशपांडे अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबर दुखी या आजारावर मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध डॉक्टर देशपांडे यांच्या पूर्ण टीमने सहभाग घेऊन तालुक्यातून आलेल्या सुमारे 200 ते 250 रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे. यामध्ये सैनिक बांधवांनी पूर्ण तालुक्यामध्ये गेले सात दिवसापासून शिबिरा बाबत जनजागृती केली होती .त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनीयामध्ये सहभाग घेतला आहे.