कवी कृष्णा घोलप यांच्याकडून बबन दादांना अभिष्टचिंतनाच्या काव्यमय शुभेच्छा

संघर्षनामा वृत्तसेवा श्रीगोंदा 

दि.१४ सप्टेंबर २०२५

प्रतिनिधी,

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव या ऐतिहासिक भूमी मधील नवोदित कवी व लेखक कृष्णा घोलप यांनी त्यांच्या लेखणीतून माजी मंत्री बबनराव दादा पाचपुते यांना अभिष्टचिंतनाच्या काव्यमय शुभेच्छा दिल्या.

घोलप यांनी ते बारावीत असतानाच २०१९ मध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळेस निबंध स्पर्धेचा विषय बबनराव पाचपुते आणि वारी असा होता. या विषयाला अनुसरून कवी कृष्णा घोलप यांनी चांगदेव पासष्टीच्या धर्तीवर बबनराव पासष्टी नावाची ओवीबद्ध दीर्घ कविता लिहिली होती. खरंतर त्यावेळेस घोलप देखील वयाने लहानच असल्यामुळे निबंध हा फक्त गद्यरूपातच लिहिला जातो हे त्यांच्या लक्षात आलं नसावं. परंतु त्यायोगे त्यावेळेस लिहिलेली ती दीर्घ कविता काल बबनराव पाचपुते यांच्या वाढदिवसानिमित्त काष्टी येथील दादांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये सादर करण्याचा योग आला.

सदर ६५ ओव्यांची ही दीर्घ कविता बबनराव पाचपुते आणि वारी किंवा दादांना लाभलेला वारकरी संप्रदायाचा वारसा या विषयावर आधारित आहे. मराठी भाषेतील अनेक उपमा अलंकार वापरून कृष्णा यांनी ही दीर्घ कविता रसामृताने नटविलीय. 

श्रीगोंदा मतदार संघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते त्यांचे बंधू प्रताप सिंह पाचपुते आणि आदरणीय बबन दादा पाचपुते या सर्वांनाच ही काव्यरचना अत्यंत भावली. सदर कविता छोटेखानी पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित करण्याबद्दल पाचपुते कुटुंब आणि कवी कृष्णा घोलप यांच्यात अल्पशी चर्चा झाली.

Related Post