संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.३१ऑगस्ट २०२५
प्रतिनिधी,
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबई मधील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आरंभले आहे. तीन दिवसांपासून उपोषण चालू आहे .लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईत तीन दिवसापासून ठाण मांडून बसला आहे. त्यांना शासन यंत्रणा कडून कसली ही सुविधा पुरवली जात नव्हत्या .खाण्या पिण्यासाठी हॉटेल बंद, पाणी लाईट बंद, संडास बाथरूम बंद, खाऊ गल्ल्या बंद, लालबाग राजा संस्थान कडून चालवलेले अन्नछत्र देखील बंद करण्यात आले होते .मराठा समाज बांधवांची कोंडी करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न करण्यात आले होते.मराठा बांधवांची कोंडी करून त्यांना हात बल करण्याचा प्रयत्न करण्यात आला . त्यात अधिक भर वरुण राजाची बरसात. मराठा समाज आझाद मैदानाच्या चिखलात आणि मराठे नेते महालात अशी अवस्था निर्माण झाली होती .अशा ही परिस्थितीत मराठा बांधव मुंबई मध्ये ठाण म्हणून बसले आहेत .परंतु ही बाब जेव्हा मराठा बांधवांच्या लक्षात आली तेव्हा असंख्य मराठा बांधव आपल्या समाज बांधवांच्या मदतीसाठी धावले.
जेऊर पंचक्रोशीचे भूषण संतोष बलभीम दारकुंडे यांनी मुंबई तील साकीनाका या ठिकाणी मराठा बांधवांसाठी अन्नछत्र चालू केले आहे. तसेच मराठा बांधवासाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. या अन्नछत्रांमधून मराठा बांधवांसाठी सकस व पौष्टिक जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्या अन्नछत्र साठी अनेक मराठा बांधवांनी आपले बहुमूल्य योगदान दिले आहे. जेऊर पंचक्रोशीतील मराठा बांधव या अन्नछत्र साठी भरीव सहकार्य करत असून स्वयंसेवक म्हणून मुंबईमधील आपल्या मराठा बांधवांसाठी हे अन्नपुरवठा देखील करत आहेत.