संघर्षनामा वृत्तसेवा | श्रीगोंदा
दि.२८ जुलै २०२५
प्रतीनिधी,
श्री विठ्ठल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव बोडखा येथील सेवानिवृत्त प्राचार्य माळशिकारे सर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमराव धोंडे तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागवडे सह. साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व पांडुरंग(काका ) गावडे, भिमराव माळशिकारे,आदेश महाराज, पत्रकार उत्तम बोडखे, निमगाव बोडखा ग्रामपंचायतचे सरपंच ईश्वर मेटे, तरडगव्हाण च्या सरपंच कुंदाताई बेरड,चवर सांगवीचे सरपंच शरद माळशिकारे,माजी सरपंच राजेंद्र बेरड ,आजी, माजी, सरपंच व ग्रामंचायत सदस्य व निमगाव बोडखा पारोडी, बोरोडी वाहिरा,घोंगडेवाडी,घोगरगाव पंचक्रोशीतून उपस्थित मान्यवरांनी तसेच माजी प्राचार्य माळशिकारे सर यांचे आप्तेष्ट व मित्र, सर्व माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला हजर राहून माळशिकारे सर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी प्राचार्य संजय गावडे सर यांनी विठ्ठल विद्यालयाच्या गुणवत्तेचा आणि गुणसंपन्न विद्यार्थ्यांचा आलेख मानताना या विद्यालयातून विविध क्षेत्रात भरारी घेणाऱ्या आणि विद्यालयाचे,गावचे गुरुजनांचे, कुटुंबाचे नाव राखताना आपापले क्षेत्रामध्ये यशस्वी वाटचाल करत असल्याबद्दल सविस्तर माहिती विशद करत या सर्व बाबी मध्ये येथील गुणवंत शिक्षक आणि सेवानिवृत्त माळशिकारे सर यांचे महत्त्वाचे योगदान असल्याबद्दलची सविस्तर माहिती विशद केली.
सेवानिवृत्त प्राचार्य माळशिकारे सर यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांचा गुणगौरव करताना शे. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार भिमराव धोंडे यांनी छोट्या लोकसंख्येच्या गावांमध्ये मोठ्या लोकसंख्येने विद्यार्थी घडले आणि ते आपापल्या क्षेत्रामध्ये सिद्धतेने काम करतात हे सर्व श्रेय येथील शिक्षक वर्गाला आणि या सर्व बाबींना आयाम देणाऱ्या माळशिकारे सर यांना जाते यावर समाधान व्यक्त करताना सर्व शाखेमध्ये प्रगत तंत्रज्ञान युक्त शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांना फायदा होईल या प्रकारचे कॅन्सर हॉस्पिटल करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
प्रसंगी माजी प्राचार्य बलभीम वाळके सर यांनी मित्रता आणि गुणवत्तेचे ज्ञानार्जन याचा समन्वय कसा असावा याबद्दल आणि इंग्रजी आणि गणित या पायाभूत विषयाने विद्यार्थ्यांना आपल्या करिअरसाठी झालेला फायदा ही बाब अविस्मरणीय असून आमच्या हातून करीअर सिद्ध झालेले विद्यार्थी हीच आमची कार्यपुंजी असल्याचे सांगत माळशिकारे सर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच प्राध्यापक गावडे सर यांनी मनोगत व्यक्त करत माजी प्राचार्य माळशिकारे सर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी श्री संदिप नन्नवरे सर, विद्यालयाचे प्राचार्य व शाळेचे सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायंबर आर. आर. यांनी केले व आलेल्या पाहुण्याचे आभार श्री नालकोल सर यांनी मानले सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
चौकट
सेवापूर्ती सोहळ्याला संबोधित करताना नागवडे कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी रयत शिक्षण संस्थेचे प्रमाण देताना जसे कर्मवीर अण्णांचे विशाल कार्य आहे त्याच वैचारिक विचाराने माजी आमदार भिमराव धोंडे यांनी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा आणली आणि या प्रवाहातून अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी काम करतात त्याचे प्रमाण देताना श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालयातून मांडलेला गुणवत्तेचा आलेख हेच सांगून जातो यामध्ये माळशिकारे सर यांचा मोलाचा वाटा असून त्यांना सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.