संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.३१ ऑगस्ट,२०२५
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंद्याचे जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांची पत्रकारिता ही बहुजन समाजाच्या हितासाठीची असून प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप यांनी व्यक्त केले आहे.
नंदकुमार कुरुमकर यांची नुकतीच श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध फेरनिवड झाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने संचालक आप्पासाहेब जगताप यांनी शिक्षक सोसायटी भवनामध्ये पत्रकार कुरुमकर यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना संचालक आप्पासाहेब जगताप म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी आपल्या 27 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये प्रत्येक घटकातील समाजाला पत्रकारितेच्या माध्यमातून योग्य तो न्याय दिला. त्यांची पत्रकारिता ही वस्तुस्थितीला धरून व अन्यायाला वाचा फोडणारी आहे. त्यामध्ये श्री कुरुमकर यांनी शैक्षणिक क्षेत्राला देखील अधिक प्राधान्य दिल्याचे संचालक श्री जगताप यांनी आवर्जून सांगितले. पुढे संचालक आप्पासाहेब जगताप म्हणाले की; श्री कुरुमकर हे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ सभासद आहेत. त्यांच्या या निवडीचा आम्हालाही सार्थ अभिमान असल्याचे सांगून श्री जगताप आणखी पुढे म्हणाले की, ज्या ज्या वेळेस माध्यमिक सोसायटी प्रशासनाने सभासदांचे हिताचे योग्य निर्णय घेतले. त्यावेळी देखील पत्रकार कुरुमकर यांनी आपल्या उत्कृष्ट लेखणीतून संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख वृत्तपत्रात वेळोवेळी प्रसिद्ध केला. एक अभ्यासू व दूरदृष्टी लाभलेले पत्रकार कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून काम करत असताना संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी असंख्य मित्रपरिवार जोडला श्री कुरुमकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता याबरोबरच रस्ते वीज पाणी या प्रश्नाची ह त्यांनी आपल्या बहारदार लेखणीतून अहोरात्र संघर्ष केला. सहकार क्षेत्रातील मान्यवरांची ही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. सर्वसामान्यांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात देखील त्यांनी आपला मौलिक वेळ दिला. पत्रकार कुरुमकर यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे तालुका व जिल्हा प्रशासनाशी देखील त्यांचे सलोख्याचे संबंध आजही कायम आहेत. त्यातून निश्चितपणे सर्वसामान्यांना न्याय मिळतो. त्यांची पत्रकार संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध फेरनिवड ही त्यांच्या कार्यकर्तुत्वाची पावती असल्याचे माध्यमिक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब जगताप यांनी सांगून पत्रकार कुरुमकर यांच्या पुढील कार्यास संचालक श्री जगताप यांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सन्मान सोहळ्यास गुणवंत शिक्षक रवींद्र भोंडवे सर, मधुकर नागवडे सर, विवेकानंद काळे सर, सोसायटीचे शाखाधिकारी वैभव चौगुले, कर्मचारी कानिफनाथ तुरकुंडे व स्वप्नील पवार आदी यावेळी उपस्थित होते.