एकलव्य संघटनेच्या वतीने कर्जत तहसीलवर महामोर्चाचे आयोजन.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२९ ऑगस्ट २०२५

प्रतिनिधी,

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने कर्जत तालुका तहसील कार्यालय वर विविध मागणी साठी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर मोर्चा सोमवार दिनांक08/09/2025 रोजी धडक महामोर्चा स्वरूपात लोकशाही मार्गाने काढण्यात येणार असून या मोर्चात एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव ढवळे साहेब , मा, सभापती म्हाडा नाशिक (राज्यमंत्री दर्जा) उपस्थित राहणार असून आक्रमक शैलीमध्ये शासनाचे लक्ष वेधणार आहेत. समवेत अहिल्यानगर, पुणे, बीड, सोलापूर जिल्ह्यातून बहुसंख्य भिल्ल समाज कार्यकर्ते समाज बांधव भगिनी सामील होणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व राज्य महासचिव तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. किरण ठाकरे सर,संघटक मोहन गोलावड ,वैजंता गोलवाड, जिल्हा प्रमुख गीताराम बर्डे , जिल्हा सचिव सोमनाथ गोरे ,विजय सूर्यवंशी, विजय बर्डे, अप्पा गोलवाड, योगेश निकम, एकनाथ बर्डे, सुरेश भोसले, दत्ता गोरे ,रावसाहेब पिपले, किरण माळी, नाना शिंदे ,जंबू अलवट आदी करनार आहेत.

 मोर्चाचे आयोजन श्रीगोंदा व कर्जत तालुका कमिटी यांचे वतीने करण्यात आले असून त्या कामी पंढरीनाथ गायकवाड ,तंट्यामामा माळी , विलास माळी, महादेव बर्डे, पपू गायकवाड, सतीश शिंदे, मंगल गायकवाड, केसर माळी, संगीता माळी,माणिक बर्डे, कांताबाई बर्डे ,पिंटू मोरे, उषा मोरे,सतीश गोरे, दत्ता गांगुर्डे, प्रल्हाद गांगुर्डे, बाळासाहेब माळी, येळपणे यांनी केले आहे.

                                *चौकट*

कर्जत तालुक्यातील भिल्ल आदिवासी समाज शासनाच्या प्रमुख योजना पासून वंचित आहे त्यांची राहती जागा, कसती जमीन, जातीच दाखले आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड यासारखे मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत याकडे कोणत्याही ग्रामपंचायतचे लक्ष नाही आजही समाज दुर्लक्षित, अशिक्षित असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. वीटभट्टी ,ऊसतोड ,सालगडी यामध्ये भरडला जात असल्याने वेळोवेळी अन्याय होतो ही बाब गंभीर असून यासाठीच या महा मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शासनाचे लक्ष वेधन्या साठी आपण बहुसंख्येने या महामोर्चात सामील व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे यांनी केले आहे.

Related Post