संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२९ जुलै २०२५
प्रतिनिधी,
भारतीय सेनेत (AMC) आर्मी मेडिकल कोर मध्ये तीस वर्षे सेवेनंतर सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांचा सेवापूर्तीचा जंगी सोहळा अहिल्यानगर मधील निंबळक या मूळ गावी शेकडो सैनिक व ग्रामस्थांच्या उपस्थित धुमधडाक्यात साजरा झाला. संध्या.चार वा. श्री साईनाथ मंदीर येथून ओपन जीप मधून मिरवणुकीला सुरुवात झाली. डीजेवर देशभक्ती गीतांच्या तालावर शेकडो सैनिकांनी तिरंगा रॅली काढली. या रॅलीमध्ये पंचक्रोशीतील लहान थोरांनी अति उत्साहात सहभाग घेतला.अनेकांनी हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम व जय जवान जय किसान या घोषणा देत परिसर व दणाणून गेले. मिरवणूक सार्थक लॉन्स मंगल कार्यालय प्रवेशद्वारा जवळ आली तेथे रांगोळी व फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये धडाकेबाज स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून शेकडो माजी सैनिक,अर्धसैनिक,वीरपिता,वीरपत्नी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सरपंच,चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य व पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावना जाजगे गुरुजी व बाळासाहेब कोतकर गुरुजी यांनी मांडली. उपस्थितांचे स्वागत सतीश गिरंगे मेजर यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाले.निंबळक गावचे सरपंच प्रियंकाताई लामखडे यांनी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, शहीद स्मारक व त्रिदन सैनिक संघटनेच्या ऑफिस साठी जागा देण्याचे आश्वासन दिले.जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांनी केलेल्या कार्याबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.व उपस्थित सर्व ग्रामस्थांना विनंती केली की सैनिक सेवेनंतर आलेल्या वास्तविक जीवनाशी माहिती कमी असते.त्यांची फसवणूक व पिळवणूक जास्त होते त्यामुळे भावकीच्या वादात जमीन,घर,बांधावरील रस्ता यावरून अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात. त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात अंकुश खोटे यांनी सैनिकांच्या कठीण काळातील प्रसंगाला उजाळा दिला व त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्राचे उत्कृष्ट वाटचालीकडे अग्रेसर आहे अशी ग्वाही दिली. सर्वांनी एकत्रित येऊन सैनिकांच्या समस्यासाठी लढा देण्यास सज्ज राहण्यास सांगितले.एकीचे महत्त्व पटवून दिले.शेवटी सत्कारमूर्ती सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांनी सर्वांचे विशेष आभार मानले.उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांनी सैनिकांचे सेवापूर्ती सोहळा व संघटनेचे कोणतेही कार्य असल्यास सार्थक मंगल कार्यालय मोफत दिले जाईल, अशी घोषणा केली.याबद्दल सर्व सैनिकांच्या वतीने त्यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करीत आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी उपस्थित भाऊसाहेब विष्णू कोतकर,सुनील कोतकर मेजर, इंजि.तुकाराम वारुळे,सुरेशराव वारुळे चेअरमन पोखर्डी,उद्धव चव्हाण शेंडी, त्रिदल सैनिक संघटनेचे (म.रा.) अध्यक्ष अंकुश खोटे,मेजर निळकंठ उल्हारे,कॅप्टन बशीर शेख,जावेद शेख, झगडे मेजर,बबन दहिफळे,नवनाथ भगत,नाना घोलप,संजय म्हस्के,एकनाथ आडसुळे मेजर,बाबासाहेब कोतकर,रावसाहेब कळमकर,मेस्कोचे दारकुंडे मेजर,शरद कातोरे,शरद पवार मेजर,लेफ्टनंट संपत निमसे,राजू कुलकर्णी,गायकवाड मेजर,शिंदे मेजर समवेत शेकडो माजी सैनिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन मारुती ताकपेरे मेजर व त्रिदल सैनिक संघ हिसळक निंबळकच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.