संस्कार भारती तर्फे अनंत कराड यांना गुणवंत साहित्यिक पुरस्कार प्रदान

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१२जुलै २०२५

शिरूर कासार (वार्ताहर) : एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष, म.सा.प.शिरूर कासार चे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड यांना साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल संस्कार भारती च्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त बीड येथील अमृत मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात गुणवंत साहित्यिक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारती देवगिरी प्रांत प्रमुख तथा म.सा.प.माजलगाव च्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा प्रा.स्नेहल पाठक तर प्रमुख अतिथी म्हणून भरत अण्णा लोळगे यांची उपस्थिती होती.

         मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातील लिहित्या हातांना बळ मिळावे, साहित्यिक दृष्टिकोनातून दुर्लक्षित-वंचित घटकांना न्याय/संधी मिळावी म्हणून साहित्यिक अनंत कराड यांनी एकता फाउंडेशन ची स्थापना करत समविचारी मित्रमंडळींना सोबत घेऊन एक राज्यस्तरीय चळवळ उभी केली. त्याचाच परिपाक म्हणून आज अनेक जिल्ह्यात एकता फाउंडेशन च्या शाखा कार्यरत असून त्यामार्फत शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात अखंड कार्य सुरू आहे. तसेच, काळ्याई कवितासंग्रह, अंदमानचा प्रवास मनीच्या कविता हा बालकाव्यसंग्रह आणि हे रामा.. हा काव्यसंग्रह अशी ग्रंथसंपदा नावावर असलेल्या कराड यांना अनेक प्रतिष्ठित राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन संस्कार भारती ने साहित्यिक अनंत कराड यांना आदर्श साहित्यिक पुरस्कार प्रदान केल्याचे संस्कार भारतीचे पदाधिकारी पत्रकार महेश वाघमारे यांनी कळवले आहे.

         साहित्यिक कराड यांच्यासह बी.जे.कुलकर्णी (शिक्षण), राजन साळवी (क्रिडा), राजेंद्र वाघमारे (मूर्तीकार), डाॅ.बी.आर.पंडित (वैद्यकीय), अनिल भंडारी (पत्रकारिता) यांनाही यावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अनंत कराड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल एकता फाउंडेशन कोअर कमिटी, सकल एकता परिवार, तालुका पत्रकार संघ, मराठवाडा साहित्य परिषद शिरूर कासार सह म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमास संस्कार भारतीचे प्रदेश मंत्री प्रमोद वझे, साहित्य विधा प्रमुख डॉ.विद्यासागर पाटांगणकर, प्रचार आणि प्रसिध्दी प्रमुख महेश वाघमारे, बीड जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सौंदत्तीकर, कोषप्रमुख संतोष पारगावकर, समन्वयक गणेश तालखेडकर, वासुदेवराव निलंगेकर, डॉ.रवींद्र शिवणीकर, डॉ.राहुल पांडव, महेश देशमुख, अनिल कुलकर्णी, लक्ष्मीकांत रुईकर, लक्ष्मीकांत खडकीकर, अनंत सुतनासे, प्रमोद कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, प्रज्ञा रामदासी, स्नेहा पारगावकर, आशा भारती, सोनल पाटील, संगीता संदिकर, रेणुका डांगे हे संस्कार भारती बीडचे कला साधक उपस्थित होते.

Related Post