संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१३ जुलै २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी:-शुक्रवार दि. ११ जुलै २०२५ रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या समवेत श्रीगोंदा-अहिल्यानगर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुभाष काळाणे, बेलवंडी चे माजी सरपंच उत्तमराव डाके, तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करून घेणेबाबत प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली.यावेळी प्रदेशाध्यक्ष यांनी मंगळवार दि.१५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:३० वा.वरिल पदाधिकाऱ्यांसह मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर प्रवेश करून घेण्यासाठी वेळ दिली आहे. सदर पक्षप्रवेश हा भाजपा पक्ष कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.तरी सदर प्रवेश कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी उपस्थित रहावे असे आव्हान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे.