संघर्षनामा वृत्तसेवा नगर
दि.१० जुलै २०२५
प्रतिनिधी,
सिसपे इन्फिनिटी व बिकन जेट्स या संस्थांमार्फत झालेल्या आर्थिक फसवणुकीची सखोल व कायदेशीर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन संपादक पत्रकार श्रीकांत अनिल ठवाळ व पै. शाम भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले.या
निवेदनात सदर संस्थांमार्फत अनेक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला असून, गुंतवणूकदारांनी अनेक महिने झाले तरीही परतावा न मिळाल्याची तक्रार केली आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीकांत अनिल ठवाळ आणि भालेराव यांनी पोलिस प्रशासनाकडे याची तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल करावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी केली.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कायदेशीर कार्यवाही जलदगतीने केली जाईल असे आश्वासन दिले.या वेळी उपस्थितांनी संबंधित गुंतवणूक योजनांचे दस्तऐवज, जाहिराती व पुरावे पोलिसांसमोर सादर केले. फसवणुकीला बळी पडलेले गुंतवणूकदारही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.