संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.११ नोव्हेंबर २०२५
प्रतिनिधी,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मात्रु संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार गतिमान करणे ही बौद्धाचार्यांचे प्रथम कर्तव्य आहे बौद्धाचार्य हा धम्म प्रचाराचा कना आहे प्रत्येक बौद्धाचार्याने आपला वेळ आर्थिक सहकार्य व संस्थेच्या कार्यासाठी सहकार्य केले पाहिजे असे प्रतिपादन मुख्य परीक्षक केद्रीय शिक्षिका वैशालीताई अहीरे यांनी केले. त्या नालंदा बुद्ध विहार नालेगाव येथे आयोजित बौद्धाचार्य परीक्षेस उपस्थित असणाऱ्या परीक्षार्थींना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. त्या म्हणाल्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या मनातील संकल्प गाव तिथे बौद्धाचार्य घर तेथे सैनिक हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.मुख्य व्यवस्थापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवंत गायकवाड होते. या वेळी मुख्य परीक्षक निसर्गंध व परीक्षक म्हणून सतिश ओहोळ व आरूण भोंगळे यांनी काम पाहिले.या प्रसंगी केंद्रीय शिक्षक बाळासाहेब धस, गौतम पाचरणे, इ. मान्यवर उपस्थित होते. या परीक्षेसाठी 27श्रामणेरांनी सहभाग नोंदवला. परीक्षा यशस्वी होण्यासाठी नितीन साळवे अविनाश राक्षे सुभाष कांबळे विशाल पवार यांनी अथक परिश्रम घेतले.