संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.३नोव्हेंबर २०२५
प्रतिनिधी,
महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ चा नियम ३३५ अन्वये दरवर्षी माहे नोव्हेंबरमध्ये निवृत्तीवेतनधारकांना ह्यातीचा दाखला देणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व निवृत्ती व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांच्या याद्या संबंधित बँकांकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत निवृत्तीवेतन धारकांनी संबंधित बँकेमध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रांच्या पुराव्यांसह समक्ष बँकेमध्ये जाऊन बँकेत उपलब्ध करुन दिलेल्या यादीमध्ये आपल्या नावासमोर स्वाक्षरी करावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जनार्दन सहारे यांनी केले आहे.