अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या खेळाडूंची यशस्वी वाटचाल

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१९ ऑक्टोबर २०२५

प्रतिनिधी,

 नुकत्याच जिजामाता महाविद्यालय,भेंडा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये श्रीगोंदा एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी व अनेक हाफ मॅरेथॉन स्पर्धा विजेती सुरेखा मातने हिने 10,000 mts. व 5,000 mts रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तसेच रिद्धी सप्रे 5000 mts. रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक, सविता वाळके भालाफेक व गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक, अश्विनी हिरडे 800 mts रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक, नांगरे ऋषिकेश 5000 mts रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक व मुलांच्या 4X400 mts रिले,4x100 mts रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या रिले संघामध्ये काळे तेजस, वायकर कृष्णा, शिंदे सुमित, राणेरजपूत करण, घोडके उज्वल यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व यशस्वी खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली.

     त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुलदादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, प्र. प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ.सुदाम भुजबळ, डॉ.नितीन थोरात, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. रमेश थोरात, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य रत्नाकर झिटे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ॲथलेटिक्स खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ, किरण बंड व जावेद शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Post