संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १७ ऑक्टोबर २०२५
प्रतिनिधी ,
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम दादा बबनराव पाचपुते यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या श्रद्धांजलीपर वक्तव्यात आ. पाचपुते म्हणाले की, शिवाजीराव कर्डिले हे साधेपणा, प्रामाणिकपणा, कार्यतत्परता आणि जनतेशी असलेली अस्सल आत्मीय नाळ या गुणांमुळे लोकांच्या मनात घर करणारे खरे लोकनेते होते. आमच्या पाचपुते कुटुंबीयांशी त्यांचे घट्ट कौटुंबिक संबंध होते. माजी मंत्री बबनदादा पाचपुते त्यांच्या समवेत विधानभवनात व मंत्री म्हणून दिलेलं योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
तसेच त्यांनी पुढे म्हटले की, त्यांच्या जाण्याने एक कर्तृत्ववान, जनसेवेसाठी समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.
शेवटी आ. विक्रम पाचपुते यांनी स्व. शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली .