भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार मेजर निळकंठ उल्हारे यांना जाहीर

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२३ ऑक्टोबर २०२५

प्रतिनिधी,

घोगरगाव ता.श्रीगोंदा अहिल्यानगर येथील कायम रहिवाशी(ह.मु.नवनागापूरचे)सुपुत्र व जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ बाबुराव उल्हारे यांनी २५ वर्ष भारत मातेच्या अखंड सेवेनंतरही कोरोना काळात जयहिंद सैनिक संस्थेच्या माध्यमातून सलग पाच महिने महाराष्ट्र शासनाच्या बरोबर अहोरात्र मोफत सेवा दिली.त्यानंतर एक वर्ष सह्याद्री चौक,एमआयडीसी अहिल्यानगर येथे गरीब कामगारांना मोफत अन्नदान केले.सैनिक क्षेत्रातही अनेक मोलाची योगदान दिले.राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेसाठी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल डॉ.मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरळी कांचन, क्रीडा मंत्रालय भारत सरकार,निती आयोग संमलित व डॉ.राजेंद्र भोळे आरोग्यसेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५ चा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदूरत्न राष्ट्रीय पुरस्कार अहिल्यानगरचे मेजर निळकंठ बाबुराव उल्हारे यांना जाहीर झाला आहे.याबद्दल संस्थेच्या वतीने निवडीचे पत्र प्रा.एकनाथ धनवटसर,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मांढरे,पोलीस अधिकारी राजेंद्र नरवडे यांनी प्रदान केले.यावेळी बीड जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब काळे मेजर,आष्टी तालुका अध्यक्ष अशोक शिंदे मेजर,बीड जिल्हा कार्याध्यक्ष संजय चौधरी मेजर,धामणगाव गटप्रमुखअमृत ढोबळे मेजर,पाथर्डी तालुका अध्यक्ष निवृत्ती घोशीर मेजर हे उपस्थित होते.

अखंड देशभक्तीची ज्योत सदैव तेवत ठेवुन अहोरात्र देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या कर्तव्यदक्ष मान्यवरांना पुढील समाजकार्यात प्रोत्साहन मिळावे.यासाठी हा राष्ट्रीय सन्मान प्रदान केला जात आहे.हा राष्ट्रव्यापी पुरस्कार वितरण सोहळा दि.३१ऑक्टोबर २०२५रोजी सायं.५ :०० वा.लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येरवडा पुणे येथे आयोजित केलेला आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे जलसंसाधन व पाटबंधारे मंत्री श्री राधाकृष्ण विखेपाटील,खासदार मेघाताई कुलकर्णी,पद्मश्री निर्मलाताई मिश्रा व रावसाहेब लवांडे यांची लाभणार असून,सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉ.मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट व डॉ.राजेंद्र भोळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या अनेक सैनिक संघटना जिल्हाध्यक्षांच्या वतीने मेजर उल्हारे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Related Post