अळकुटी त पहिल्यांदाच स्नेह मेळाव्यात १२१ माजी विद्यार्थ्यां चा सहभाग .

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.७ नोहेंबर २०२५

 पारनेर [ सुरेश खोसे पाटील यांजकडून ] - पारनेर तालुक्यातील अळकुटी च्या साईनाथ विद्यालयात १९९४ - ९५ मध्ये इयत्ता १० वी त शिक्षण घेतलेले १३१ माजी विद्यार्थी तब्बल ३० वर्षांनी स्नेह मेळाव्या च्या निमित्ताने एकत्रित येत मोठ्या उत्साहाने जल्लोषात सहभागी झाले .

      गेल्या वाटा पुन्हा गाठल्या, भेटली शाळेची दारे, गुरुजनांचे आशीर्वाद लाभले, फुलल्या भावना साऱ्या, अशा आठवणींनी भरलेल्या वातावरणात रयत शिक्षण संस्थेचे अळकुटी येथील श्री साईनाथ विद्यालयात इयत्ता १० वी १९९४ - ९५ च्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी ३० वर्षांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या काळातील शाळेचे दिवस आज त्या निमित्ताने पुन्हा जगायला , पाहायला व अनुभवायला मिळाले , असा प्रत्येक क्षण खास होता. 

    या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अळकुटी चे माजी सरपंच बाबाजी भंडारी यांनी भूषवले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईनाथ विद्यालयाचे प्राचार्य संदीप म्हस्के , सेवानिवृत्त शिक्षक आर जी झावरे , ए जे ठुबे , आर ए गोरडे व सर्व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती लाभली.

     सर्व माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनात उत्साहाने सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकी जपत , आपण शिक्षण घेत नावारूपाला आलो , शाळेसाठी काही तरी देणे लागतो , या भावनेतून फुल ना फुलाची पाकळी म्हणून माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील नवीन इमारतीसाठी २१ पंखे भेट स्वरूपात दिले , तर डॉ . अभिजीत सुभाष आग्रे शाळेच्या प्रदेशव्दारा चे सुशोभीकरण्यासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले .

     या कार्यक्रमासाठी सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून खंडू म्हस्के यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास एक एक झाडाचे रोपटे भेट म्हणून दिले. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी व उद्योजक संजय दाते व अजित पानमंद यांनी मित्रां प्रती आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक एक भेटवस्तू दिल्या. 

     या कार्यक्रमाचे नियोजन विनोद फापाळे, बजरंग डेरे, शिवाजी जाधव, संतोष थोरात, होनाजी पानमंद, अजित पानमंद, दिपक कड, प्रसिद्ध उद्योजक संजय दाते , अरुण आवारी व सौ. मीना साबळे , चित्रा झावरे ,मिना गोरडे , मंगल म्हस्के यांनी केले. 

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग डेरे , विनायक सोनवणे, दीपक कड, विनायक लोंढे , यांनी केले. प्रसिद्ध सिने निर्माते डॉ . महेंद्र शिंदे , प्रसिद्ध नेत्र शल्य विशारद डॉ .अभिजीत आग्रे, ॲड . बाळासाहेब मावळे , उद्योजक शरीफ पटेल , प्राचार्य शरद झावरे व इतरांनी मार्गदर्शन केले .

     यावेळी डिजे च्या तालावर संगित लावत मनसोक्त नाचण्याचा आनंद घेत या स्नेह संमेलनाचा मनसोक्त आनंद लुटला .

                                  चौकट - 

     तब्बल ३० वर्षांनी हे १२१ मित्र - मैत्रिणी एकत्रत येत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला , सांगताना गहिवरून आले , पुन्हा भेटण्याच्या आणा - भाका घेण्यात आल्या .

Related Post