संघर्षनामा वृत्तसेवा l नगर
दि.३० ऑक्टोबर २०२५
वाळकी प्रतिनिधी :- गुंडेगाव ते देऊळगाव सिद्धी मार्गावर खड्याचे जणू जाळे झाले आहे. या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे,नगर ते गुंडेगाव हा मार्ग श्रीगोंदा तालुक्याला जोडणारा जवळचा रस्ता आहे. सदर रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा अंतर्गत रस्ता असल्याने वाहनांची दररोज रेलचेल असते. याच रस्त्यावर दोन तालुक्यांला जोडणारे गावे हे बाबुर्डी, वाळकी, देऊळगाव सिद्धी, गुंडेगाव, राळेगण असे गावे येतात. या गावावरुन श्रीगोंदा तालुक्याला जाता येते या रस्त्याने वाहनांची जास्त वर्दळ असल्याने दररोज शेकडो वाहने या रस्त्यांने वाहतूक करतात. तसेच देऊळगाव गुंडेगाव हद्दीमधून होत असलेल्या मुरुम व दगड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.तसेच अन्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असुन या वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण झाली असल्यामुळे या मार्गावर अपघात होताना दिसत आहेत, मागील काही महिन्यांपासून हा रस्ता खराब झाला आहे. परंतु, या रस्त्याचे दुरुस्तीचे काम होण्याची प्रतिक्षा प्रवाशी व नागरिक करत आहेत. सदर काम होत नसल्याने रस्त्यावरील खड्डेच खड्डे आणि खड्यात रस्ता झाला आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्याची दूरुस्तीसाठी अनेक लोकांनी बांधकाम विभाग तसेच स्थानिक पुढारी यांच्याकडे केली परंतु अद्यापही रस्ता जैसे थे अवस्थेत आहे. त्यामूळे वाहनधारकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या लगत असणाऱ्या गावांतील नागरिकांसह वाहनधारक यांना अहमदनगर येथे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांना गरोदर स्त्रिया, नोकरदार वर्ग, विद्यार्थी,आजारी वयोवृद्ध नागरिकांना या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना मरणयातना सोसण्यासारखे झाले आहे, प्रवाशी जीव धोक्यात घेऊन प्रवास करत आहेत, त्यामुळे हा रस्ता कधी दूरूस्त होतो? यांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.तसेच अधिकारी, लोकप्रतिनिधी, पुढारी, नेते, याबाबत काय कार्यवाही करणार की फक्त तेरी भी चूप मेरी भी चुप अशीच अवस्था या रस्त्याबाबतीत नागरीकांना पाहायला मिळत आहे. व संबंधित कंत्राटदार काम करतांना बरेच वेळा असे दिसते की निकृष्ट कामे करत असल्याने हा रस्ता लवकर खराब होताना कायम पहायला मिळत आहे तसेच सदर कामे जरी ठेकेदाराला दिले असले तरी ही कामे धिम्या गतीने करताना दिसत असतात, त्यामुळे वाहानधारकांना अधिकच कसरत करावी लागत असते असे जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी व नागरिकांच्या रस्ता दुरुस्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चौकट..
दिवाळी पूर्वी नगर ते गुंडेगाव रस्ता पाहणी करण्यात आली आहे,सदर कामांबाबत ठेकेदार यांना सूचना केल्या आहेत लवकरच पाऊस उघडल्यावर रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करून हे काम कसे चांगले होईल याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे.तसेच भविष्यात अनाधिकृत रस्ते खांदणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली जावून नुकसान भरपाई घेण्यात येईल यामुळे कोणीही बेकायदा रस्ता खांदण्याचे धाडस करू नये.असे आणल्यास नागरिकांनी बांधकाम विभागात तक्रार करावी.
सचिन चव्हाण - सा.बा.विभाग, अहिल्यानगर.
चौकट...
गुंडेगाव देऊळगाव रस्त्यांची अवस्था खराब असून खड्डे पडले आहेत.काही ठिकाणी पूर्ण रस्ता उखडल्याने गाडी चालवताना त्रास होतो आहे,यातच बस वेळेवर नाहीत यामुळे काॅलेज मध्ये वेळेवर जाता येत नसुन स्वतः गाडी चालवत असताना मोठी वाहने अंगावर येण्याची भीती वाटते यातच खड्डयामुळे गाडी आदळून अपघात होत आहे.यातून मोठे नुकसान होते आहे.रस्त्याचे तातडीने नव्याने डांबरीकरण करावे ही विनंती.
अपूर्वा आगळे - महाविद्यालय विद्यार्थीनी.