संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२० नोव्हेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी,
सत्य,न्याय आणि जनहितासाठी निडरपणे आवाज बुलंद करणारे आष्टीचे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब साबळे यांना महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला.या ऐतिहासिक क्षणी आष्टीची पत्रकारिता राज्यभर तेजाने झळकली आहे.
सातारा जिल्ह्यातील वडूज येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित भव्य सोहळ्यात डीएसपी न्यूज लाईव्हचे संस्थापक दत्तात्रय सयाजी फाळके यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.खासदार उदयनराजे भोसले आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मीडियाद्वारे मनापासून शुभेच्छा पाठवल्या.लेखणीचा लढा… जनतेचा विश्वास!
अण्णासाहेब साबळे यांच्या १५ वर्षांच्या परखड पत्रकारिता प्रवासात
भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराविरुद्ध निर्भीड आवाज,दिव्यांग,निराधार आणि गोरगरीबांच्या वेदनांना न्याय,प्रशासनातील त्रुटींवर अचूक बोट,लोकशाही मूल्यांची ठाम बाजू,असा दमदार वारसा त्यांनी निर्माण केला.लोकशाही पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष,जागतिक लोकवार्ता यूट्यूब चॅनेलचे संपादक,दैनिक लोकनेता,लोकमत,लोकमंथन, सिटिझन,प्रभास केसरी व संघर्षनामा या अनेक माध्यमांतून असंख्य लढे लढणारा जाणता,जागरूक आणि जबाबदार पत्रकार म्हणून त्यांची ओळख राज्यभर दृढ झाली आहे.
सन्मानाचा सुवर्णक्षण-आष्टीची पत्रकारिता झळकली!
या राज्यस्तरीय सन्मानानंतर आष्टीत मित्रपरिवार आणि मान्यवरांनी फेटा, शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन अण्णासाहेबांचा उत्स्फूर्त सत्कार केला.उपस्थित मान्यवर:
ह.भ.प.राजू महाराज लोखंडे,
दैनिक लोकशाचे निवासी संपादक उत्तम हजारे,डीएसपी न्यूज प्रतिनिधी सचिन महाराज कांबळे,समाजसेवक बबन शिंदे,सरपंच परिवंत गायकवाड,
प्राचार्य अशोक डोके सर,
कवीवर्य ह.भ.प.महादेव महाराज लांडगे,कवी बाळासाहेब बोडखे, अशोक महाराज काकडे,पत्रकार निसार शेख,पत्रकार अक्षय विधाते, पत्रकार अमोल जगताप,पत्रकार पवार तसेच महाराष्ट्रतील पत्रकार बांधव,सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य मान्यवर.सोशल मीडियावर राज्यभरातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव!
सांस्कृतिक तेजाने उजळलेला सोहळा
सुप्रसिद्ध गायिका गायत्री साळवे पिचली माझी बांगडी फेम
ह.भ.प. शिवानीताई शिंदे रडू नको बाळा फेम मराठी चित्रपट सूड शकारंभ टीम निवेदक राहुल कोळी, निवेदिका काजल ढाणे यांच्या उपस्थितीने सोहळ्याला सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले.
समर्पणातून सन्मान, कार्यातून गौरव! पत्रकार अण्णासाहेब साबळे यांच्या या भव्य सन्मानामुळे आष्टीची पत्रकारिता,लोकशाही मूल्ये आणि समाजसेवेची परंपरा
महाराष्ट्रात नव्या अभिमानाने उभी राहिली आहे.