महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नारायण राणेंच्या वादग्रस्त कृत्याचा निषेध

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदे 

दि.३०ऑगस्ट२०२४

प्रतिनिधी,

श्रीगोंदा:मालवण येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ABP माझाच्या महिला पत्रकाराचा माईक ओढून घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. या वर्तनाचा तीव्र निषेध करत श्रीगोंदा तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आवाज उठवला असुन पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर केले, ज्यात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार पत्रकारितेवरील भ्याड हल्ल्याचे गंभीर उदाहरण असून,पत्रकारांच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर दबाव आणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान आहे या घटनेबाबत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


 पत्रकार संघाचे पदाधिकारी माधव बनसूडे,ज्ञानेश्वर येवले,अमोल झेंडे,अमर घोडके,राजेंद्र राऊत,अनिल तुपे,नितीन रोही,शफिक हवालदार, किशोर मचे, आणि वैभव हराळ यांनी यावेळी वज्रमुठीने निवेदन सादर केले.

Related Post