पीडित व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारसांनी प्रस्ताव सादर करावेत

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.३ डिसेंबर २०२५

प्रतिनिधी,

 अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमान्वये, खून किंवा अत्याचारामुळे मृत्यू ओढवलेल्या प्रकरणांतील पीडित व्यक्तींच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अशा पात्र ४७ कुटुंबांतील वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह १० डिसेंबर २०२५ पूर्वी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे.

​जिल्ह्यात सन २०१२ ते २०२५ या कालावधीत अशा एकूण ६२ प्रकरणांची नोंद असून, त्यापैकी आतापर्यंत ८ पीडित कुटुंबांतील पात्र वारसांना नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित ५४ प्रकरणांपैकी ७ कुटुंबांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

​दि. २० नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार, उर्वरित ४७ पात्र कुटुंबांनी आपले प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, नगर–मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर या पत्त्यावर सादर करावेत, असे‌ही श्री.कोरगंटीवार यांनी कळविले आहे.‌

Related Post