संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.१९जुलै २०२४
...अनमोल विचार....
नेतृत्व गुण हा प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोगी पडतो. संधी मिळाली तर त्याचा योग्य वापर जरूर करा.
समन्वय साधून माणसांना जोडत चला.
त्यासाठी सतत प्रयत्नशील रहा.
सर्व सामान्य जनतेबरोबर संवाद साधत राहावे. त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सामील व्हावे. आनंदामध्ये त्यांची प्रशंसा करावी आणि दुःखामध्ये त्यांची विचारपूस करून त्यांना सांत्वन द्यावे.
सर्वांबरोबर चांगला सु - संवाद साधत रहावे.
आपले ध्येय समाजाला पटवून सांगा.
यशस्वी होण्यासाठी हे जरुरी आहे.
आपले विचार प्रभावीपणे पटवून सांगावे.
आपली विचारधारा त्यांच्यामध्ये रुजवा.
त्यासाठी सतत प्रयत्न करीत रहा.
त्याशिवाय हे शक्य नाही.
आपण भूतकाळामध्ये काही चुका केल्या असतील त्या प्रामाणिकपणे मान्य करा. दुसऱ्यांच्या चांगल्या कार्याची देखील नेहमी प्रशंसा करा.
समाजामध्ये घडत असलेल्या दैनंदिन घटनांचा बारीक अभ्यास करा, सूक्ष्म अवलोकन करीत रहा.
याच अनुभवाचा वापर करा.
आपल्या संघटनेमध्ये समन्वय साधून कौशल्याने माणसांना एकत्र करा.
सर्व एकत्र आल्याशिवाय हे शक्य नाही.
माणसांना जोडायचे आहे, त्यांना तोडायचे नाही.
संघटनेमध्ये पदाची लालसा कधीही ठेवू नका.
पद तुमच्या कर्तुत्वाने मिळावा.
संघटनेची बांधणी नेहमी समन्वयाने करावी.
संघटनेमध्ये कार्य करणारे कणखर, दृढनिश्चयी व आत्मविश्वास ने भरलेले असावे.
दैनंदिन घडणाऱ्या घटनेचा अभ्यास करूनच योग्य दिशा ठरविली जावी.
आपल्याबरोबर कार्य करणाऱ्यावर विश्वास असावा.
प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी.
पदाधिकारी यांनी सर्वांना न्याय द्यावा.
नाविन्य स्वीकार करावे, स्वतः प्रोत्साहित रहावे आणि इतरांना देखील प्रोत्साहित करावे.
यशस्वी झाला तर त्याचे श्रेय सर्वांना द्यावे.
काम करताना कार्यकर्त्यां कडून झालेल्या चुकाची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. कार्यकर्त्यांना निष्पक्ष, निस्वार्थी आणि दयाळू भावनेने कार्य करीत राहावे.
शिस्तीचे व वेळेचे पालन सर्वांनी करावे.
कार्य करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये शिष्टाचार जरूर पाळा.
समाजाबद्दल आपुलकी, निष्ठा, जबाबदार आणि प्रामाणिक रहावे.
समाजाला सन्मान द्या, त्यांना एकजूट ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
त्यांच्यामध्ये फूट पडेल असे कोणतेही कार्य करू नका.
स्वतः प्रामाणिक रहा, सहनशील रहा आणि काळानुसार बदल जरूर करा.
चारित्र्यसंपन्न व नैतिकदृष्ट्या सुदृढ रहा.
कार्यामध्ये दूरदृष्टी असली पाहिजे, सहकाऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि सकारात्मक ध्येय ठेवावे.
नेहमी इतरांपेक्षा दोन पावले पुढेच राहिले पाहिजे.
मा.सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर