संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२२ ऑक्टोंबर २०२४
प्रतिनिधि,
लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आदर्श माता स्वर्गीय जमुनाबाई दादू गोरखे यांचे सोमवार दिनांक १४/१०/२०२४ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले असून गोरखे परीवार दुखाच्या छायेत
आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जगताना भुकेल्याची भूक व तहानल्याची तहान भागवण्याच्या भावनेने ममत्व जपले असून त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या.
त्यांचे देहावसान सोमवार, भागवत एकादशी निमित्त झाले असून परमेश्वरी संकेत मानला जातो. ईश्वरी सत्ते पुढे इलाज नाही त्यांच्या जाण्याने गोरखे परिवार, आप्तेष्ट पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होते . त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुलीं, नातवंडे असा परिवार आहे त्या श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन भगवानराव गोरखे यांच्या मातोश्री होत.
त्यांचा दशक्रिया विधी बुधवार २३/१०/२०२४ रोजी सकाळी ७:३० मिनिटांनी वैकुंठ धाम लोणी व्यंकनाथ ,महादेव मंदिर पाठीमागे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे होणार असून या प्रीत्यर्थ हरिभक्त परायण ज्ञानदेव माऊली नलगे महाराज यांचे सकाळी प्रवचन होणार आहे.
या पूज्य माऊलीच्या आत्म्यास सदगती लाभो, चिरशांती लाभो,अशी संघर्षनामा मल्टीमीडिया परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!!