संघर्षनामा न्यूज l पाथर्डी
दि.३०मे २०२४
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील एफ.डी.एल. शिक्षण संस्था संचालित भालेश्वर हायस्कूल भालगाव विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च २०२४ च्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विशेष प्राविण्यश्रेणीमध्ये ६४ पैकी ४२ विद्यार्थी आले आहेत. विजय अर्जुन खेडकर याने शाळेत पहिला क्रमांक मिळवला. त्याला ९२.४०% गुण मिळाले आहेत.
परीक्षेत विद्यालयाचे एकूण ६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्यश्रेणीत ४२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये १९ विद्यार्थी व द्वितीय श्रेणीमध्ये ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १)विजय अर्जुन खेडकर ९२.४०%,२) प्रतिक्षा परमेश्वर गिऱ्हे ९०.२०%, ३) गायत्री सखाराम कोठुळे ८८.६०% हे विद्यार्थी अनुक्रमे तीन क्रमांकात उत्तीर्ण झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमान गोर्डे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, विश्वस्त पृथ्वीसिंह भैय्यासाहेब काकडे, मुख्यकार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ, शैक्षणिक विभागाच्या प्रमुख वंदना पुजारी,अशोक आहेर, विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमान गोर्डे यांनी अभिनंदन केले आहे तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.