उन्हाळी क्रीडा शिबिराची धूम - (२०२३)

संघर्षनामा न्यूज़। श्रीगोंदा 

दि. 1मे 2023

लिंपणगाव (प्रतिनिधी) 

परीक्षेचा हंगाम संपल्यानंतर विदयार्थ्यांना उन्हाळी सुट्टी सुरू होते याच सुट्टीचा फायदा घेत. मेरी मेमोरीयल हायस्कूल मध्ये क्रीडा शिबिराचे आयोजन केले होते. आपली मुले काही नविन कौशल्य शिकतील त्यांच्या कला गुणांचा विकास होईल अशी पालकाची धारणा होती. त्यामुळे पालकांनी या उन्हाळी शिबिराला पसंती दर्शविली होती. कोरोना काळात मोबाईलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना मैदानावर खेळण्याचे प्रोत्साहन मिळेल नविन मित्र मंडळीशी भेटीगाठी होतील त्यांचा शारीरिक व मानसिक विकास देखिल होईल. याच उद्देशाने मेरी मेमोरीयल हायस्कूल काष्टी शाळेच्या क्रीडांगणावर  २४ ते २९ एप्रिल या तारखेस या भव्य शिबिराचे आयोजन केले होते.

         काल दि. २९ एप्रिल रोजी क्रीडा शिबिराचा समापन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या भव्य सोहळ्याला, मेरी मेमोरीयल शाळेच्या अध्यक्षा - मा. रत्ना जॉन झकारीया, शाळेचे कार्यकारी अधिकारी - मा सालोमन जगले सर, शाळेच्या शिक्षण आ  (C.E.O) - मा आशा जॉन झकारीया, शाळेच्या मुख्याध्यापिका - मा. योगिता साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          कार्यक्रमात उपमुख्याध्यापिका  शितल जगले, कोच निरीक्षक छाया मिस, लेरेसा मिस  आणि सर्व शिक्षीका वर्ग तसेच कर्मचारी वर्गाने सदर कार्यक्रम सुशोभित करण्यात हातभार लावला. ह्या ६ दिवसीय शिबिरात मुलांकरीता, काष्टी शाळेने - स्कॉश, थ्रोबॉल, डॉजबॉल, झुंबा दौंड शाळेने - फूटबॉल, तर पाटस शाळेने - मार्शल, कराटे, खोखो, व्हॉलीबॉल खेळाचे आयोजन आपआपल्या शाळेनी केले होते. कोच म्हणून विश्‍वास भोसले, महेश माने आणि वरगडे सर यांची शाळेकडून निवड करण्यात आली होती. शाळेच्या सर्व मुलांना सहभाग पत्र व T-Shirt देऊन त्यांचे गुण गौरव करण्यात आले होते. अशा प्रकारे उन्हाळी शिबिराचा समापन सोहळा उत्साहात पार पडला.

Related Post