वस्तीगृहाच्या मदतीसाठी गौतमी पाटील श्रीगोंद्यात,3 मे ला रंगणार लावणीचा बहार

संघर्षनामा न्यूज़। श्रीगोंदा 

दि. 1मे 2023

 मागासवर्गीय अनाथ मुलांच्या वस्तीगृह  बांधकामासाठी 3 मे बुधवार रोजी सायंकाळी 7:00 वाजता सबसे कातील गौतमी पाटील या प्रसिद्ध नृत्य बिजलीचा लावणी वआर्केस्ट्राचा कार्यक्रम श्रीगोंदा नागरी मध्ये आयोजित केला असून या कार्यक्रमाचा  तालुक्यातील रसिकांनी आनंद घ्यावाआणि सामाजिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन  प्रमुख आयोजक तथा खादीचे माजी चेअरमन भगवानराव गोरखे यांनी संघर्षनामाच्या माध्यमातून केले आहे. 

श्रीगोंद्यात मागासवर्गीय मुलांचे दर्जेदार वस्तीगृह बांधणे व त्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणेअभिप्रेत असून  त्याकामी सदर कार्यक्रमाचे नियोजन आहे. हा कार्यक्रम डोळ्यांचं पारणं फेडणारा असून त्याची जय्यत तयारी केलेलीआहे.  सुसज्ज पुरुष, महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था, भव्य स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम,दक्ष कायदेशीर प्रक्रिया,तैनात पोलीस बंदोबस्त असणार आहे. यासाठी पै. अप्पासाहेब सोनवणे ,राजु कोथिंबीरे यांचे सौजन्य असून या बहारदार कार्यक्रमाला कसलेही गालबोट न लावता शांततेत आनंद घ्यावा असं ते म्हणाले. 

सदर कार्यक्रमासाठी रु. 500/300/200/- प्रमाणे तिकीट विक्री चालू असून याबाबत भगवानराव गोरखे ,मिराताई शिंदे ,सत्यवान शिंदे ,मुकुंद सोनटक्के ,प्रशांत शिंदे यांचेकडे चालू आहे.  कार्यक्रम स्थळी तिकीट विक्री उपलब्ध असणार आहे. आधिक माहितीसाठी मो. 8928674666वर संपर्क करावा असं आवाहन भगवानराव गोरखे यांनी केलं आहे.

Related Post