श्रीगोंदा | संघर्षनामा न्युज
लिंपणगाव( प्रतिनिधी ) - शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संघटनेने विनाअनुदानित शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी घेतली शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट.
अघोषित शाळा घोषित करणे, त्रुटी शाळांची यादी लावून या अधिवेशनात निधी तरतूद करणे, २०टक्के ४० टक्के शाळांचे नियमित वेतनास निधी मंजूर करणे, प्रचलित अनुदानाबाबत कार्यवाही करणे संदर्भात शिक्षणमंत्री यांची भेट घेतली.
आज आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, चंद्रकांत म्हात्रे, के.पी.पाटील सर, जयवंत भाबड, राहुल पाटील व रुपाली कुरूमकर यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेतली. १)अघोषित शाळा घोषित करणे.
२)त्रुटी शाळांची यादी तात्काळ लावून याच अधिवेशनात निधी तरतूद करणे.
३)२० टक्के ४० टक्के शाळांचे नियमित वेतनासाठी पूर्ण निधी मंजूर करणे.
४)प्रचलित अनुदानाबाबत कार्यवाही करणे संदर्भात शिक्षणमंत्री यांचेशी भेट घेऊन चर्चा झाली व निवेदन देण्यात आले.