अक्षरांना शत्रु समजणाऱ्यांना महात्मा फुल्यांनी अक्षरांचा मित्र बनविले- प्रशांत गावडे

संघर्षनामा न्यूज़ । श्रीगोंदे 

दि. 29 नोहे.2022

प्रतिनिधी ,

बेलवंडी बु. येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सामाजिक क्रांतीचे प्रणेते, स्त्री शिक्षणाचे उद्धारक, महात्मा फुले यांची पुण्यतिथी संपन्न झाली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय निवड खराडे ओंकार याने तर अनुमोदन लबडे वैभव याने दिले.

या प्रसंगी विदयालयाचे उपमुख्याध्यापक दादाजी बागुल, पर्यवेक्षक आनंदा खेडकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रशांतकुमार गावडे व विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते महात्मा फुल्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शितल फुले हिने केले.  याप्रसंगी महात्मा फुल्यांच्या जीवनकार्यावर हिरडे पृथ्वीराज ,खामकर सायली,डाके सृष्टी,शेलार अंकीता या विदयार्थ्यांची भाषणे झाली. 

याप्रसंगी इथापे प्रतिक्षा हिने महात्मा फुल्यांच्या जीवनावर सुमधुर आवाजात कविता सादर केली.ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय शेलार यांनी महात्मा ज्योतीराव फुले हे एकद्रष्टे समाजसुधारक होते,स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते बालविवाहबंदी,बालहत्या बंदी,ब्राम्हण स्त्रियांचे होणारे केशवपन, या विरोधात त्यांनी नाव्हव्यांचा संप घडवून आणला.समाजात असणारीअंधश्रद्धा,अज्ञान याचे समूळं उच्चाटन करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून त्यांनी आपले विचार मांडले व समाज परिवर्तनात महात्मा फुल्यांचे योगदान बहुमोलाचे आहे .

 हिमालयातून जशा अनेक नदया उगम पावतात त्याप्रमाणे . फुल्यांच्या विचारातून व कृतीतून अनेक महापुरुष उदयाला आले,असे मनोगत व्यक्त केले.

अक्षरांना शत्रू समजणाऱ्यांना ज्योतीरावांनी अक्षरांचा मित्र बनवण्याची किमया केल्याचे प्रतिपादन अध्यक्ष प्रशांतकुमार गावडे यांनी केले.तसेच

भारतात प्रत्येक शतकात काही पृथ्वी मोलाची रत्ने जन्माला येतात,त्यापैकीच महात्मा फुले  १८४८ साली पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी काढली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्घारी, या उक्तीनूसार कुटुंबातील स्त्री शिकली तर सर्व कुटुंबाला साक्षर करेन ही दूरदृष्टी महात्मा फुल्यांची होती म्हणूनच आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने  प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, विद्यमान राष्ट्रपती द्रोपदीताई मूर्मू इ.

महात्मा फुल्यांनी शिक्षण क्षेत्राची एक पाऊलवाट बनविली म्हणूनच इतर शिक्षण महर्षी शिक्षण संस्था काढू शकले.त्यांचे विचार सर्वानी अंगिकारले तरच त्यांचीपुण्यतिथी साजरी करण्याचा हेतू सफल होईल,असेही ते म्हणाले.

आभार प्रदर्शन इथापे प्रतिक्षा हिने केले.या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन लाढाणे सायली व लाढाणे आकांक्षा यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन ९वी क च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी यशस्वी रित्या पार पाडले.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम बुधवंत व सांस्कृतिक विभाग प्रमूख सुजाता डाके, गुरुकुल प्रमुख श्री दिपक कुलांगे यांनी विशेष अभिनंदन केले.

Related Post