विद्यार्थ्याला सत् संगत,असेल तर जीवनाला संजीवनी मिळते - अलकाताई दरेकर

संघर्षनामा न्यूज़। श्रीगोंदा 

दि. 30एप्रिल 2023

 लिंपणगाव (प्रतिनिधी)- शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी चांगली संगत जोडावी त्यातून निश्चितच जीवनाला संजीवनी मिळते, परिसाचा लोखंडाला स्पर्श झाल्यास लोखंडाचे देखील सोने होते असे गौरवोद्गार मुख्याध्यापिका अलकाताई दरेकर यांनी व्यक्त केले.

 पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयात सन 2004-05 यावर्षातील माजी  विद्यार्थ्यांनी विद्यालयात स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सोपानराव लाढाणे हे होते. 

यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत श्रीमती दरेकर पुढे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये आजही शिक्षकांबद्दल आदराची भावना आहे. 19 वर्षानंतर गुरु शिष्य एकत्र आल्याने दुग्ध शर्करा योग लाभला. आजचा दिवस हा अविस्मरणीय असून, जेथे ज्ञान मंदिरात ज्ञानाचे धडे मिळाले त्या ज्ञानमंदिरातील गुरुला देव मानला जातो. देव माणसांमध्ये आहे. ही भावना विद्यार्थ्यांमध्ये दिसली. निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार केल्याने अनेक विद्यार्थी हे प्रगतशील बागायतदार बनले, तर अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले. आमच्या कष्टाचे फलित झाल्याचे सांगून माजी विद्यार्थ्यांना पुढील भावी जीवनासाठी श्रीमती दरेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र कळस्कर म्हणाले की, माझा अनुभव हेच माझे जीवन असे महात्मा गांधी म्हणत आम्ही देखील विद्यार्थी हेच आमचे दैवत  मानून ज्ञानदानाचे प्रामाणिकपणे काम केले. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्याला शिक्षा देताना शिक्षकाचा सकारात्मक दृष्टिकोन असतो. त्यातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला  प्रेरणा मिळते. आज अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ अधिकारी बनलेत. हा आमच्या दृष्टीने अभिमान असल्याचे कळस्कर यांनी सांगितले.

माजी विद्यार्थी संदीप मोटे यावेळी म्हणाले, शालेय जीवनातील विद्यार्थ्याने एकमेकांच्या सुखदुःखात राहून प्रसंगी मदतीसाठी आधार देऊ शिक्षकांनी चांगले संस्कार केले. म्हणूनच आम्ही सर्व क्षेत्रात यशस्वी झाल्याचे सांगितले.

श्री मच्छिंद्र मडके यावेळी म्हणाले की,माजी विद्यार्थ्यांनी 19 वर्षानंतर विद्यालयातील त्या काळच्या शिक्षकांची स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने गळाभेट घेतली. त्यामुळे गुरु शिष्याचे नाते अधिक घट्ट झाल्याचे सांगून, जीवन जगत असताना आई-वडील गुरुजनांचा  आदर ठेवून जेथे उत्तम शिक्षण मिळाले त्या ज्ञानमंदिराला वेळोवेळी भेटी देऊन माजी विद्यार्थ्यांनी सतत आर्थिक बळ द्यावे असे सांगितले.

याप्रसंगी माजी मुख्याध्यापक सोपानराव लाडाने, जनार्दन जायकर, बबनराव देशमुख, दत्तात्रेय सस्ते, श्रीमती उषाताई शेजुळ, दिगंबर पुराणे, मच्छिंद्र मडके, राजेंद्र हिरवे बाबासाहेब लष्कर श्रीमती वर्षा दरेकर तर विद्यार्थ्यांच्या वतीने दत्तात्रेय दंडवत, सचिन हिरवे, वाल्मीक मोटे, नवनाथ जाधव, आशा पवार, संगीता पवार ,कानिफनाथ हिरवे, सागर कांडेकर, खराडे, अविनाश टिळेकर आदींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत एकमेकांशी संवाद साधला

यावेळी माजी मुख्याध्यापक शहाजी कुतवळ, माजी वरिष्ठ लिपिक विलास साळवे,माजी कनिष्ठ लिपिक कैलास जगताप, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, सुभाष मोहिते, बापू फराटे आदींसह शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत नलगे, दत्तात्रय दंडवत, सचिन हिरवे, संदीप मोहिते, गणेश हिरवे, सागर कांडेकर, मनीषा पवार आणि वर्षा पल्ले आदींनी मोठे  परिश्रम घेतले.

        सूत्रसंचालन सचिन हिरवे यांनी केले तर आभार सचिन दानवे यांनी मानले.

Related Post