संघर्षनामा न्यूज़ । नगर
दि. 9जुलै 2022
गुंडेगाव प्रतिनिधी :- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे (दि.९ जुलै) रोजी जिल्हा प्राथमिक शाळा कुताळमळा ( गुंडेगाव) यांच्या वतीने पर्यावरण पुरक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्याच्या मुखातून गोड वाणी मधुन विठ्ठल..विठ्ठल... विठ्ठला... हरि ओम विठ्ठला..., विठ्ठल नामाची शाळा भरली... माऊली.. माऊली.. अशा विठ्ठलनामाने चिमुकल्यांनी कुताळमळा परिसरातून दिंडी सोहळा दुमदुमून सोडला. या दिंडीत बालवारकरी हातात भगव्या पतका, टाळ, मृदूंग, विणा घेऊन सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरी... या गाण्यातून वृक्षारोपण व वृक्षसंवधानाच्या घोषणादेऊन वृक्षलागवडीचे महत्व परिसारातील नागरिकांना पटवून देत होते. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुंडेगाव येथील सर्वच शाळांमध्ये बालवारकर्यांनी दिंडी काढली. पर्यावरण पुरक दिंडी चे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुताळमळा येथील मुख्याध्यापिका आशा गिरवले, शिक्षिका दिपस्वी शितोळे- पवार यांनी दिंडी चे आयोजन केले होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी व चिमुकल्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पहिली पासून चौथी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व विद्यार्थ्यांसमवेत भंजनी मंडळ, महिला, ग्रांमस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. विठ्ठल-विठ्ठल, हरीनामाचा गजर, विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन झाडे लावा पर्यावरण वाचवा संदेश देत शाळेपासुन माळवाडी हनुमान मंदिर येथे प्रदक्षिणा घालत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते, हलक्या पावसाच्या सरीत लहान थोरापर्यंत मुखातून हरीनामाचा गजर दुमदुमला, या पर्यावरण दिंडी सोहोळ्यासाठी वारकरी संप्रदायाचे गुंडेगाव ते श्रीधर स्वामी, सुरेगाव पायी दिंडीचे आयोजक उत्तम रामराव भापकर यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडी सोहळ्यात जेष्ठ मार्गदर्शक विठ्ठल कुताळ, सिताराम कुताळ, सुनील कुताळ महाराज, काशिनाथ कुताळ ग्रामपंचायत सदस्य नवनाथ कुताळ, युवा नेते सतिश काका चौधरी, गुंडेगाव वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक सचिन कुताळ, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष राजेंद्र पिंपरकर,पत्रकार संजय भापकर, शहाजी कुताळ, विजय कुताळ, सागर कुताळ, अक्षय कुताळ, संतोष कोतकर, शरद कुताळ, वैशाली कुताळ, शितल कुताळ, साक्षी कुताळ, कोमल महिंद्र कुताळ, शारदा पिंपरकर , दिपाली कुताळ, अर्चना कुताळ, जयश्री कुताळ, रेखा कुताळ , कोमल भापकर, क्रांती कुताळ आशा सेविका कविता कुताळ, मनिषा कुताळ, प्रिती भापकर अदि ग्रांमस्थ उपस्थितीत होते.